
Urban Vibe Clip 2 OWS: क्लिप-ऑन डिझाईन आणि असे आहेत खास फीचर्स! 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच झाले नवीन ईयरबड्स
Urban Vibe Clip 2 OWS earbuds भारतात लाँच करण्यात आले आहे. हे नवीन गॅझेट ‘क्लिप-ऑन डिझाईनची यूटिलिटी आणि ओपन-ईयर ईयरबड्सचा कम्फर्ट’ यांचे उत्तम कॉम्बिनेशन ऑफर करते. या नवीन आणि लेटेस्ट लाँच करण्यात आलेल्या ईयरबड्समध्ये एआय ईएनसी, ब्लूटूथ व्ही5.3, आयपीएक्स 5 रेटिंग आणि दुसऱ्या फीचर्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. याची किंमत देखील सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे. या ईअरबड्सचे फीचर्स आणि त्याचे इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
URBAN Vibe Clip 2 Open-Ear Wireless Earbuds मर्यादित काळासाठी इंट्रोडक्ट्री प्राइस 1,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे ईअरबड्स Urban ची वेबसाइट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि देशभरातील निवडक ऑफलाइन रिटेल पार्टनर्सकडून खरेदी केले जाऊ शकतात. (फोटो सौजन्य – X)
Urban Vibe Clip 2 मध्ये ओपन-ईयर क्लिप-ऑन डिझाईन देण्यात आले आहे. हे एक एयरफ्लोवाला, प्रेशर-फ्री एक्सपीरियंस ऑफर करतो. ज्यामुळे यूजर्स म्यूजिक, कॉल्स आणि पॉडकास्टचा आनंद घेऊ शकणार आहेत आणि यासोबतच त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणासोबत जागरूक राहू शकणार आहे. हे ईअरबड्स जॉगिंग, साइक्लिंग, वर्कआउट किंवा आउटडोर काम करताना वापरले जाऊ शकतात.
16.2mm डायनेमिक ड्राइवर्ससह, URBAN Vibe Clip 2 दावा करतात की, हे ‘क्रिस्टल-क्लियर ऑडियो, डिटेल्ड हाईज, बॅलेंस्ड मिड्स आणि डीप बास आउटपुट’ ऑफर करतो. यामध्ये बॅकग्राऊंड आवाज कमी करण्यासाठी आणि कॉलची क्लॅरिटी वाढवण्यासाठी AI एंवारमेंटल नॉइस कँसिलेशन (AI-ENC) सपोर्ट देण्यात आला आहे.
Bluetooth 5.3 सह हे डिव्हाईस स्टेबल ट्रांसमिशन आणि लो लेटेंसी ऑफर करतो. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट डिव्हाईसमध्ये डुअल डिवाइस पेयरिंग फीचर आहे, जे युजर्सना एकाच वेळी दोन डिव्हाईस कनेक्ट करण्याची सुविधा देतो, ज्यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉप यांच्यामध्ये लगेच स्विच केले जाऊ शकते.
URBAN Vibe Clip 2 चार्जिंगसह एकूण 60 तासांचा प्ले टाईम ऑफर करतात आणि एकदा चार्ज केल्यानंतर 18 तासांचा कंटीन्यूअस प्लेबॅक देतात. यामध्ये Type-C फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. ज्यामुळे ईअरबड्स थोडा वेळ चार्ज केल्यानंतर देखील तासंतास वापरले जाऊ शकतात. ईयरबड्स IPX5 वॉटर-रेजिस्टेंट आहे, त्यांना घाम आणि स्प्लॅश प्रतिरोधक बनवते. हलकी फ्रेम आणि एर्गोनोमिक क्लिप-ऑन डिझाइन ईयरबड्सना दिर्घकाळापर्यंत डिस्कंफर्टशिवाय मजबूतीने एका जागेवर ठेवते. Vibe Clip 2 मध्ये Siri आणि Google Assistant सारख्या व्हॉईस असिस्टेंट्सचा सपोर्ट आहे आणि यामध्ये टच-सेंसिटिव कंट्रोल्स देण्यात आले आहेत.