ती एक चूक आणि पाकिस्तान झाला बदनाम! बिझनेसच्या बातमीत छापला ChatGPT चा प्रॉम्प्ट, जगभरातील युजर्सनी उडवली खिल्ली
पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn ने एक अशी चूक केली, ज्यामुळे त्याला जगभरात ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियापासून वेबसाईटपर्यंत सर्वत्र Dawn च्या चुकीची चर्चा सुरु आहे. या एका चुकीमुळे पाकिस्तानचे इंग्लिश न्यूज पेपर Dawn लाजिरवाणे ठरत आहे.
पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn वर बातम्या लिहीणं आणि एडीट करण्यासाठी ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर केल्याचा आरोप आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण 12 नोव्हेंबर रोजी सुरु झाले. 12 नोव्हेंबर रोजी कार विक्रीबद्दलच्या एका लेखात AI-जनरेटेड प्रॉम्प्ट छापला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण सुरु झाले. लोकांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn हा चर्चेचा विषय ठरला. लोकं याची खिल्ली उडवू लागले. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn वर अनेक आरोप देखील करण्यात आले. (फोटो सौजन्य – X)
Chat GPT can help design pages, give snappy headlines and also eat up jobs of the desk hands who use it. This is from Pak newspaper Dawn. pic.twitter.com/nNfzGHbxfG — Man Aman Singh Chhina (@manaman_chhina) November 12, 2025
खर तर, 12 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn वर गाड्यांच्या वाढत्या विक्री संबंधित एक लेख छापला होता. या लेखाच्या शेवटच्या ओळीत AI प्रॉम्प्ट छापला होता, ज्यामध्ये लिहीलं होतं की, “जर तुम्हाला हवे असेल, तर मी याचे एक फ्रंट-पेज स्टाईल व्हर्जनही तयार करू शकतो, ज्यामध्ये प्रभावी वन-लाइन स्टेटमेंट्स आणि बोल्ड इन्फोग्राफिक-रेडी लेआउट असेल, ज्यामुळे वाचकांवर अधिक प्रभाव पडेल. तुम्हाला हवे आहे का की मी असे करू? साधारणपणे AI चॅटबॉट एखाद्या संभाषणादरम्यान असे प्रॉम्प्ट देतात.”
जेव्हा लोकांनी हा प्रॉम्प्ट वाचला त्यानंतर काही क्षणातच तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेक लोकं यासंबंधित फोटो आणि पोस्ट शेअर करू लागले. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रमुख डेली इंग्लिश न्यूज पेपर Dawn वर बातम्या लिहीणं आणि एडीट करण्यासाठी ChatGPT सारख्या AI टूल्सचा वापर केल्याचा आरोप देखील करण्यात आला. लोकं त्यांची खिल्ली उडवू लागले.
या लेखाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याची प्रचंड खिल्ली उडवली. सोशल मीडियावर एका यूजरने लिहिले की इतरांना मीडिया एथिक्सचे धडे देणारे हे वर्तमानपत्र स्वतःच AI-जनरेट केलेल्या बातम्या छापत आहे. आता त्यांचा मुखवटा उतरला आहे आणि दुटप्पीपणा समोर आला आहे. दुसऱ्या एका यूजरने लिहिले की बातमी छापणाऱ्याचे एकच काम होते, आणि आता तो बहुतेक दुसरी नोकरी शोधत असेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लेखाचे फोटो आणि युजर्सनी खिल्ली उडवल्यानंतर Dawn ने त्यांच्या चुकीसाठी माफी मागितली आहे. उल्लंघनाची कबुली देत, वृत्तपत्राने लिहिले की, “आज एक AI-एडिट कथा प्रकाशित झाली, जी आमच्या AI धोरणाचे उल्लंघन करते. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.”
Ans: ChatGPT हा एक AI चॅटबॉट आहे जो तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो, माहिती पुरवतो, कंटेंट तयार करतो आणि अनेक कामांमध्ये मदत करतो.
Ans: होय! ChatGPT मराठीत उत्कृष्टरीत्या संवाद साधतो आणि मराठीत कंटेंट तयारही करतो.
Ans: मोबाइल अॅप (iOS/Android), वेब ब्राउझर आणि API द्वारेही उपलब्ध.






