
iQOO Z11 Turbo Leaks: 200MP कॅमेरा आणि 7,600mAh बॅटरी... लाँचिंगपूर्वीच पावरफुल स्मार्टफोनचे फीचर्स लीक
लीकनुसार, iQOO Z11 Turbo मध्ये क्वालकॉमचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Snapdragon 8 Gen 5 दिला जाण्याची शक्यता आहे. गेमिंग अधिक स्मूद करण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये Adreno 829 ग्राफिक्स असणार आहे. हा फोन 16GB LPDDR5X RAM आणि सुपर-फास्ट UFS 4.1 स्टोरेजसह लाँच केला जाणार आहे, ज्यामुळे डेटा ट्रांसफर आणि गेम लोडिंगमध्ये अजिबात वेळ लागणार नाही. असं सांगितलं जात आहे की, हा फोन आऊट ऑफ द बॉक्स लेटेस्ट Android 16 वर चालणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी iQOO Z11 Turbo स्मार्टफोनची खासियत म्हणजे यामध्ये मोठी बॅटरी दिली जाणार आहे. असा दावा केला जात आहे की, iQOO मध्ये 7,600mAh बॅटरी दिली जाऊ शकते. याशिवाय यामध्ये 120W वायर्ड फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील दिला जाणार आहे, जो काही मिनिटांत स्मार्टफोन फुल चार्ज करू शकणार आहे.
फोटोग्राफीसमध्ये देखील iQOO Z11 Turbo स्मार्टफोन कमाल करणार आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यासोबत 8MP चा सेकेंडरी सेंसर देखील असू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आगामी स्मार्टफोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
Year Ender 2025: Gemini AI मुळे वर्षाचा शेवट होणार आणखी खास, सोशल मीडियावर अपलोड करा तुमचे खास फोटो
iQOO Z11 Turbo फोनमध्ये 6.59 इंचाचा फ्लॅट LTPS OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे, 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह उपलब्ध असणार आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये मेटल फ्रेमचा वापर केला जाण्याची देखील शक्यता आहे. धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी याला IP68 आणि IP69 रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, यात अल्ट्रा-फास्ट 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर असण्याची शक्यता आहे.
Ans: गेमर्स, हेवी यूजर्स आणि हाय-परफॉर्मन्स हवे असलेले युजर्स यांच्यासाठी iQOO फोन उत्तम आहेत.
Ans: लीकनुसार 200MP कॅमेरा देण्यात येऊ शकतो, पण याची कंपनीकडून अधिकृत पुष्टी नाही.
Ans: होय. बहुतांश iQOO फोनमध्ये फास्ट/अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सपोर्ट असतो.