
फोल्डेबल iPhone ला टक्कर देण्यासाठी Samsung सज्ज! स्क्रीन, प्रोसेसरसह Galaxy Z Fold 8 चे इतर फीचर्स लीक, इतकी असेल किंमत
Samsung चा नवा ड्रामा! आगामी Galaxy S26 सीरीजची किंमतच ठरेना… या कारणांमुळे वाढली कंपनीची डोकेदुखी
फीचर्सवर विश्वास ठेवला तर सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 आगामी फोल्डेबल आयफोनला टक्कर देऊ शकतो. कंपनी या फोनच्या स्क्रीनमध्ये बदल करणार नाही. मात्र बॅटरी, प्रोसेसर आणि कॅमेरा सर्वकाही प्रिमियम असणार आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे या आगामी फोनची कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र याचे काही फीचर्स लीक झाले आहेत. या आगामी फोनमध्ये आतापर्यंतचे सर्वात दमदार फीचर्स दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल प्रोससेर दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे मल्टी टास्किंग आणखी सोपे होणार आहे. गेमर्स आणि हेवी सॉफ्टवेयरचा वापर करणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. कंपनी यामध्ये एआय इंटीग्रेट करण्याचा देखील विचार करत आहे.
सॅमसंग आगामी फोल्डेबल फोनच्या स्क्रीनवर सध्या काम करत आहे. फोन फोल्ड केल्यावर दिसणारी क्रीज यामध्ये दिसणार नाही. या आगामी फोनची डबल स्क्रीन फ्लेक्सिबल असणार आहे. लीक्सवर विश्वास ठेवला तर असाच डिस्प्ले अॅपल देखील त्यांच्या फोल्डेबल फोनमध्ये देऊ शकतो. यामध्ये 2 nm A20 Pro चिप दिली जाऊ शकते. सॅमसंगच्या फोल्डेबल फोनमध्ये 8.2 इंचाचा मुख्य फोल्डेबल डिस्प्ले आणि 6.56 इंचाचा कवर डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा आगामी फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 7 च्या तुलनेत अतिशय स्लिम आणि हलका असणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 फोनमध्ये 4800 mAh बॅटरी आणि 25W चा फास्ट चार्जर दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच यामध्ये अँड्रॉईड 17 चे ऑपरेटिंग सिस्टम देखील दिले जाऊ शकते. हा फोन एआय सपोर्टसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.
यामध्ये केवळ दमदार फीचर्सच नाही तर यामध्ये अपडेट एआईसह मोठा कॅमेरा देखील दिला जाण्याची शक्यता आहे. या आगामी फोल्ड फोनमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड आणि 12MP चा टेलीफोटो लेंस दिला जाऊ शकतो. यासोबतच प्रोफेशनल फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 12MP चे दोन फ्रंट कॅमेरे दिले जाऊ शकतात.
सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 8 कधी लाँच होणार आणि त्याची किंमत काय असणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र या डिव्हाईसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 2 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. हा फोन जून 2026 मध्ये लाँच होऊ शकतो.
Ans: Galaxy S आणि Galaxy Z (Fold/Flip) सीरीज हे Samsung चे सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रीमियम स्मार्टफोन्स आहेत.
Ans: लीक रिपोर्ट्सनुसार Galaxy Z Fold 8 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे (कंपनीकडून अधिकृत माहिती नाही).
Ans: होय. Samsung मध्ये Knox Security असल्यामुळे डेटा आणि प्रायव्हसी उच्च स्तरावर सुरक्षित राहते.