AI चा वापर करा अन्यथा नोकरी सोडा! या कंपनीने जारी केला अजब गजब नियम, कर्मचाऱ्यांना दिली एक आठवडाची मदत
पूर्वीच्या काळाचा विचार केला सामान्य माणसाच्या तीन गरजा होत्या, या म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. मात्र आजच्या डिजिटल काळाचा विचार केला तर आजही सामान्य माणसाच्या केवळ तीनच गरजा आहेत. मात्र यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा नाही तर स्मार्टफोन, इंटरनेट आणि AI यांचा समावेश झाला आहे. सध्या एखादा व्यक्ती कदाचित जेवणाशिवाय राहू शकतो, पण स्मार्टफोन, इंटरनेट आणि AI शिवाय जगणं कठीण झालं आहे, स्मार्टफोनमध्ये इंटरनेट आणि एआय असणं सध्याच्या काळाची गरज बनले आहे. AI च्या मदतीने आपण आपली अनेक काम अगदी सहज करू शकतो. तसेच अनेक कंपन्या देखील त्यांच्या स्वतःचे AI चॅटबोट लाँच करण्यावर अधिक जास्त भर देत आहेत. प्रत्येक AI ची एक विशेषता आहे. कोणी कोडींगमध्ये तर कोणी बुद्धिबळ खेळण्यात पटाईत आहे.
भारतात TikTok चं कमबॅक नाहीच, सरकारनेच केलं स्पष्ट! अजूनही प्लॅटफॉर्मवरील बंदी कायम
आजच्या काळात अनेक कंपन्या AI ला विशेष महत्त्व देत आहेत. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांऐवजी AI ला कामावर ठेवले आहे. अनेक कंपन्यांनी AI एफिशियन्सी वाढवण्यावर भर दिला आहे. आता तर एका कंपनीने असा नियम जारी केला आहे की, कर्मचाऱ्यांनी AI चा वापर केला नाही तर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल. (फोटो सौजन्य – Pinterest)
गुगलनंतर आता कॉइनबेसच्या सीईओ ब्रायन आर्मस्ट्रॉन्ग यांनी देखील सांगितले आहे की, त्यांची कंपनी AI चा मोठ्या प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने अशा इंजिनियर्सला घरचा रस्ता दाखवला आहे, ज्यांनी कोडींगसाठी AI चा वापर करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की कंपनीत AI चा वापर वाढला आहे आणि ज्या कर्मचाऱ्यांनी AI चा वापर करण्यास नकार दिला आहे किंवा जे कर्मचारी त्यांच्या कामात AI चा वापर करत नाही, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येईल असं कंपनीने सांगितलं आहे.
आर्मस्ट्रॉन्गने आपल्या संपूर्ण टीमला AI टूल शिकण्यासाठी एका आठवड्याचा वेळ दिला आहे. त्यांनी सांगितलं आहे की सुरुवातीला त्यांचे टीम मेंबर्स त्यांच्याकडे येत होते आणि म्हणत होते की ते पुढील तिसऱ्या महिन्यापर्यंत AI सह 50 टक्के काम सुरू करतील. मात्र असं होणार नाही. आर्मस्ट्रॉंगने त्यांच्या संपूर्ण टीमला AI टूल्स शिकण्यासाठी एक आठवड्याचा वेळ दिला आहे. मात्र आता त्यांनी सांगितले आहे की कंपनीतील 33 टक्के कोडिंग काम AI द्वारे केले जात आहे आणि पुढील काही आठवड्यात ते 50 टक्के केले जाईल.
यापूर्वी गुगलने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना AI चा वापर करण्यास सांगितले होते. कंपनीच्या वरिष्ठ नेतृत्वाने कर्मचाऱ्यांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये AI वापरण्यास सांगितले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जे असे करत नाहीत ते या उद्योग शर्यतीत मागे राहतील. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, AI बाबत स्पर्धा तीव्र होत आहे आणि गुगलयामध्ये मागे राहू शकत नाही. त्याचप्रमाणे अमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टसह इतर कंपन्याही दैनंदिन कामांमध्ये AI चा समावेश करण्यावर भर देत आहेत. अमेझॉनने असेही म्हटले आहे की आता अनेक कामे AI एजंट्सद्वारे केली जात आहेत, त्यामुळे कर्मचारी कमी केले जातील.