भारतात TikTok चं कमबॅक नाहीच, सरकारनेच केलं स्पष्ट! अजूनही प्लॅटफॉर्मवरील बंदी कायम
अलीकडेच अशी अपडेट समोर आली होती की चिनी व्हिडिओ ट्रिमिंग प्लॅटफॉर्म TikTok पुन्हा एकदा भारतात एन्ट्री करणार आहे. TikTok ची वेबसाईट भारतातील अनेक युजर्ससाठी ओपन झाली आहे. अनेक युजर्स ही वेबसाईट एक्सेस करू शकतात, असं सांगितलं जात होतं. यामुळे TikTok ची भारतात एंट्री होणार अशी शक्यता दाट झाली होती. मात्र हे खरा आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. TikTok खरंच भारतात परतणार आहे का, याबाबत आता भागात सरकारनेच खुलासा केला आहे.
भारत सरकारने सांगितला आहे की, 2020 मध्ये चिनी ॲप TikTok वर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी आजही कायम आहे. भारतातील TikTok वरील बंदी हटवण्यात आली नाही. त्यामुळे हे स्पष्ट झालं आहे की TikTok सध्या तरी भारतात एंट्री करणार नाही.
भारत सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTok ला अनलॉक करण्याचे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. अलीकडेच काही रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, युजर्स डेस्कटॉप ब्राउजरवर TikTok ची वेबसाइट एक्सेस करू शकत आहे. ज्यामुळे TikTok ची भारतातील होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या सर्व दाव्यांना भारत सरकारने खोडून काढले आहे. सरकारसोबत जोडलेल्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले आहे की, भारत सरकारने TikTok ला अनलॉक करण्याचे कोणतेही आदेश जारी केले नाहीत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.(फोटो सौजन्य – Pinterest)
जून 2020 मध्ये झालेल्या सीमा वादानंतर भारत सरकारने TikTok सह 59 चिनी ॲप्सवर बॅन लावला. सरकारने त्यावेळी सांगितले होते की, अॅप्स देशाच्या “सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी” धोका आहेत. त्यामुळे आता अशा ॲप्सवर बंदी घातली जात आहे. त्या यादीत WeChat, Weibo, Clash of Kings आणि CamScanner सारख्या ॲप्सचा समावेश होता. मात्र कालांतराने ही यादी वाढत गेली आणि चिनी अॅप्सवरील बंदी देखील वाढवण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय (MeitY) ने त्यावेळी असं सांगितलं होतं, की या ॲप्सबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असं सांगितलं जात आहे की हे ॲप्स युजर्सच्या डेटाचा दुरुपयोग करत आहे आणि युजर्सची माहिती भारताबाहेरील सर्वरला पाठवत आहेत.
मंत्रालयने सांगितलं होतं की भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि संरक्षणाला विरोध करणाऱ्या घटकांकडून या डेटाचे संकलन, माईनिंग आणि प्रोफाइलिंग केले जात आहे, ही सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी गंभीर आणि तात्काळ चिंतेची बाब आहे. म्हणूनच आपत्कालीन पावले उचलावी लागली. या सर्वांचा विचार करून चिनी ॲप्स वर बंदी घालण्यात आली होती.
2020 मध्ये ज्यावेळी TikTok वर बंदी घातली गेली त्यावेळी भारतात TikTok ची सुमारे 12 करोडहून अधिक युजर्स होते. ज्यामुळे ते कंपनीसाठी जगातील सर्वात महत्त्वाचे बाजारपेठ बनले. बंदी घालण्यात आल्यानंतर, TikTok ने म्हटले होते की ते वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी भारत सरकारशी सहकार्य करण्यास तयार आहे. तथापि, यानंतर कंपनीकडून कोणतेही अधिकृत विधान आले नाही.