सोशल मिडीया अॅपवर वेळ वाया घालवताय? आत्ताच फोनमध्ये करा ही सेटिंग, मोबाईल वापरण्याच्या व्यसनापासून होईल सुटका
प्रत्येकाचं सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट असतं. आपल्या स्मार्टफोनमध्ये अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहेत, ज्यावर आपण आपला प्रचंड वेळ खर्च करतो. सोशल मिडीयामुळे आपल्याला नवीन मित्र बनवण्याची संधी मिळते, इतर शहरांविषयी आणि देशांविषयी माहिती मिळते. इतकच नाही तर आपल्या जगात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट कामांची माहिती देखील आपल्याला सोशल मिडीयाच्या मदतीने मिळते. आजच्या काळात सोशल मिडीयाची क्रेझ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच लोक त्यांच्या दिवसातील बराच वेळ सोशल मिडीयावर खर्च करतात.
हेदेखील वाचा- Google करणार टाइम ट्रॅव्हल, युजर्सना 20 वर्ष जुने दृश्य पाहण्याची संधी मिळणार
काहीवेळा आपण आपल्या झोपेचा वेळ देखील सोशल मिडीयावर खर्च करतो. आपल्यापैकी असे अनेकजण असतील जे रोज ठरवतात सोशल मिडीयावर कमी वेळ खर्च करणार, मात्र फोन हातात घेताच आपल्याला वेळेचं भानच राहत नाही. या सर्वांवरील उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या फोनमधील एक खास सेटिंग सुरु करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्ही सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर किती वेळ खर्च केला आहे, हे तुम्हाला कळेल आणि हा वेळ तुम्ही कंट्रोल देखील करू शकता. (फोटो सौजन्य- pinterest)
स्मार्टफोन वापरताना वेळ कधी निघून जातो हे आपल्याला कळत नाही. आपण एका मिनिटासाठी फोन उचलतो आणि जेव्हा तो खाली ठेवतो तेव्हा 2 तास झाले असतात. तासंतास मोबाईल वापरण्याचे व्यसन अनेकांना जडले आहे. जर तुम्हालाही याचे व्यसन लागले असेल, तर तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण फोनचा अतिरेक केल्याने अनेक प्रकारचे नुकसान होतात. जर तुम्हाला फोन जास्त वापरण्याचे व्यसन लागले असेल आणि तुम्हाला ही सवय सोडायची असेल तर तुम्ही तुमच्या फोनमध्ये सेटिंग चालू करू शकता. हे सेटिंग चालू केल्याने ॲपवर टायमर सेट होतो. त्यानंतर वेळ संपताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळायला सुरुवात होते.
हेदेखील वाचा- कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16? जाणून घ्या प्रत्येक देशतील iPhone 16 ची किंमत
अँड्रॉईड स्मार्टफोन चालवणाऱ्यांसाठी ही सेटिंग अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये यूजर्स कोणते ॲप किती वेळ वापरायचे त्यानुसार वेळ सेट करू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही ॲपवर एक तासाची वेळ मर्यादा सेट केली असेल, तर एक तासानंतर ॲप तुम्हाला वेळ संपल्याची सूचना आपोआप पाठवेल. तुम्ही हे सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ॲप्ससाठी करू शकता. विशेषतः सोशल मीडिया ॲप्ससाठी, जसे की इंस्टाग्राम, फेसबूक, व्हॉट्सॲप.