• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • You Can See Twenty Years Ago View By Using Google Map New Feature

Google करणार टाइम ट्रॅव्हल, युजर्सना 20 वर्ष जुने दृश्य पाहण्याची संधी मिळणार

गुगलने अलीकडेच त्याच्या लोकप्रिय नेव्हिगेशन ॲप गुगल मॅप्ससाठी काही नवीन आणि आकर्षक वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत. आता तुम्ही काही वर्षांपूर्वी तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी कशा दिसत होत्या हे पाहण्यासाठी भूतकाळात परत जाऊ शकता. काही महिन्यांपूर्वी, Google ने नवीन नेव्हिगेशन वैशिष्ट्ये देखील आणली होती. या वैशिष्ट्यांच्या मदतीने, वापरकर्ते EV चार्जिंग पॉइंट शोधू शकतात आणि काही शहरांमध्ये मेट्रो तिकीट देखील बुक करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 30, 2024 | 08:32 AM
Google करणार टाइम ट्रॅव्हल, युजर्सना 20 वर्ष जुने दृश्य पाहण्याची संधी मिळणार

Google करणार टाइम ट्रॅव्हल, युजर्सना 20 वर्ष जुने दृश्य पाहण्याची संधी मिळणार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Google Maps Time Machine Feature: सध्या तंत्रज्ञानाच्या जगात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. प्रत्येक कंपनी आणि अ‍ॅप्स आपल्या सुविधा अपडेट करत आहेत. याचा फायदा त्या कंपनीच्या आणि अ‍ॅपच्या युजर्सना होत आहे. असंच एक नवीन फीचर आता नेव्हिगेशन अ‍ॅप Google Map घेऊन येणार आहे. ह्या फीचरच्या मदतीने युजर्स 20 वर्षे आधीचा व्ह्यु पाहू शकणार आहेत. त्यामुळे हे नवीन फीचर फायदेशीर तर असणारच आहे, पण त्यासोबतच मजेशीर देखील असणार आहे.

हेदेखील वाचा- फोनमध्ये मिळणार मनीष मल्होत्राचे खास डिझाइन, Oppo Reno12 Pro 5G Manish Malhotra Limited Edition लवकरच लाँच होणार

तुम्ही कधी कार्टून बघितलं आहे का? तर कार्टूनमध्ये असं दाखवलं जात की एक टाईम मशीन असते ज्याच्या मदतीने आपण आपल्या भूतकाळात जाऊ शकतो, आणि आपलं शहर किंवा आपलं घर 20 वर्षांपूर्वी कसं होतं हे पाहू शकतं. असचं काहीसं फीचर आता Google Map घेऊन येणार आहे. त्यामुळे जुनी शहर किंवा आपलं जुनं घर पाहण्यासाठी तुम्हाला टाईम मशीनचा वापर करून 20 किंवा 30 वर्षे मागे जाण्याची गरज नाही. तुम्ही केवळ Google Map च्या या नवीन फीचरची मदत घेऊ शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

गुगलने गुगल मॅप्स आणि गुगल अर्थसाठी असे एक फीचर जारी केले आहे, जे त्याच्या जुन्या स्थितीतील व्ह्यु दाखवते. याचा अर्थ असा की आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटरवर 20 किंवा 30 वर्षांपूर्वी एखादे ठिकाण कसे दिसत होते ते सहजपणे पाहू शकता. गुगलने आपल्या मॅप सेवेत टाईम मशीनसारखे फीचर जोडले आहे. त्याच्या मदतीने, आपण भुतकाळात प्रवास करू शकतो आणि आपल्याला आवडत असलेल्या ठिकाणांचे जुने रूप पाहू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही एखादी इमारत, रस्ता किंवा ती बांधली त्यावेळेची कोणतीही विशिष्ट जागा पाहू शकता. गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, बर्लिन, लंडन, पॅरिस सारख्या शहरांची खास ठिकाणे 1930 पासून आजपर्यंत पाहता येतात.

हेदेखील वाचा- तुम्हाला तुमच्या मोबाईलचे रेडिएशन माहित आहे का? अशा पद्धतीने चेक करा आणि जीवघेणे आजार टाळा

हे वैशिष्ट्य कसे वापरावे?

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला गुगल मॅप्स किंवा गुगल अर्थवर जाऊन तुम्हाला पहायचे असलेले ठिकाण शोधावे लागेल. त्यानंतर तुम्हाला लेयर्स ऑप्शनवर जाऊन टाईमलॅप्स ऑप्शन चालू करावा लागेल. यानंतर तुम्ही 20 वर्षाआधी संबंधित ठिकाण कसं दिसतं होतं, ते पाहू शकता. आता तुम्ही केवळ वर्तमानातच प्रवास करू शकत नाही, तर काही वर्षांपूर्वी तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी कशा दिसत होत्या हे पाहण्यासाठी ‘भूतकाळात परत जाऊ’ शकता. या नवीन वैशिष्ट्याला टाइम मशीन असे नाव देण्यात आले आहे, जे इतिहासाबद्दल उत्सुक असलेल्यांसाठी विशेषतः मनोरंजक ठरेल.

Google च्या मते, काही हवाई आणि उपग्रह फोटो 80 वर्षांपर्यंत जुने आहेत, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचा भूतकाळ पाहता येतो. गुगलचे म्हणणे आहे की हे वैशिष्ट्य संशोधक आणि संस्थांसाठी विशेषतः प्रकल्पांसाठी हे नवीन फीचर उपयुक्त ठरेल. गुगल अर्थच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही शहराचा ऐतिहासिक परिसर जाणून घेऊ शकता. यासोबतच गुगलने आपल्या स्ट्रीट व्ह्यू फीचरमध्ये महत्त्वाचे अपडेट्सही केले आहेत. आता ही सुविधा जवळपास 80 देशांमध्ये उपलब्ध होणार आहे. यासोबतच गुगलने गुगल मॅप्स आणि गुगल अर्थमध्ये सॅटेलाइट इमेजरी देखील अपग्रेड केली आहे

Web Title: You can see twenty years ago view by using google map new feature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 08:32 AM

Topics:  

  • google map new feature

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य

नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य

दातांवर साचलेला पिवळा थर मिनिटांमध्ये होईल गायब! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील प्रभावी, अंधारातही चमकतील दात

दातांवर साचलेला पिवळा थर मिनिटांमध्ये होईल गायब! स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील प्रभावी, अंधारातही चमकतील दात

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला

नदीत बुडून तरुणाचा मृत्यू; तोल जाऊन पाण्यात पडला अन् बुडून मृत्यू झाला

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

Numerology: मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच…

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा विकतसारखा मऊसूत Dhokla, नोट करून घ्या जाळीदार ढोकळा बनवण्याची रेसिपी

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.