Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज, पहिला मिक्स्ड रियलिटी हेडसेट लाँच; असे आहेत स्पेसिफिकेशन्स
टेक कंपनी विवो मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. आता विवो जगातील टेक जायंट कंपनी Apple ला टक्कर देणार आहे. टेक कंपनीने Vivo Vision Explorer Edition लाँच केले आहे. हे डिव्हाईस कंपनीचे पहिले मिक्स्ड रियलिटी (MR) हेडसेट आहे. हे डिव्हाईस गुरुवारी चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. Apple Vision Pro ला टक्कर देण्यासाठी विवोने हे हेडसेट लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेले हे डिव्हाईस डुअल 8K हाई-रेजोल्यूशन Micro-OLED डिस्प्ले फीचर करतो आणि Qualcomm च्या Snapdragon XR2+ Gen 2 चिपने सुसज्ज आहे.
OriginOS Vision वर चालते आणि हेडसेटमध्ये एक मोठा फ्रंट व्हिझर आणि पॅडेड रिअर हेडबँड आहे. Vivo Vision Explorer Edition आई ट्रॅकिंग आणि माइक्रो-जेस्चर कंट्रोलला सपोर्ट ऑफर करतो. चीनी टेक ब्रँडने आतापर्यंत Vivo Vision हेडसेटची किंमत आणि उपलब्धता जाहीर केली नाही. मात्र हे हेडसेट आधीासूनच चीनमधील 12 अधिकृत व्हिवो एक्सपिरीयन्स स्टोअर्समध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. कंपनीने असेही पुष्टी केली आहे की प्रवेश वाढविण्यासाठी लवकरच आणखी एक्सपिरीयन्स स्टोअर्स उघडले जातील. (फोटो सौजन्य – X)
Vivo Vision Explorer Edition डुअल बाइनाक्यूलर 8K (3,552×3,840 pixels) Micro-OLED डिस्प्लेने सुसज्ज आहे, ज्यामध्ये P3 colour gamut चे 94 टक्के कवरेज आणि 100 ते 1000 डिग्रीपर्यंत सपोर्ट देण्यात आला आहे. हे Qualcomm च्या Snapdragon XR2+ Gen 2 चिपवर आधारित आहे. MR हेडसेट Vivo चे कस्टम ब्लू ओशियन पावर मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करते. हेडसेट OriginOS Vision वर आधारित आहे, जे Vivo चे इन-हाउस ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि MR साठी ऑप्टिमाइज्ड आहे आणि हे 13ms ची अल्ट्रा-लो लेटेंसी ऑफर करतात.
कंपनीने गुरुवारी लाँच ईव्हेंटदरम्यान सांगितलं आहे की, मिक्स्ड रियलिटी हेडसेट प्रीसाइज 1.5-डिग्री आई ट्रॅकिंग आणि 26 डिग्री डेप्थ ऑफ फील्डसह माइक्रो जेस्चर रिकॉग्निशन सपोर्ट ऑफर करतो. ज्यामध्ये 175-डिग्री वर्टिकल इंटरॅक्शन रेंज आहे. Vivo Vision Explorer Edition चे वजन 398 ग्रॅम आहे. हे डिव्हाईस 83mm उंच आणि 40mm जाड आहे. हेडसेटमध्ये पॅडेड रियर हेडबँड आहे. हे 3D वीडियो रिकॉर्डिंग आणि स्पॅटियल फोटो कॅप्चरिंगला सपोर्ट करतो. तथापि, काही एडवांस्ड फंक्शनॅलिटी निवडक Vivo स्मार्टफोन्ससोबत जोडण्याची आवश्यकता असेल.
Vivo Vision हेडसेट 180 डिग्री पॅनोरमिक फील्ड ऑफ व्यू, स्पॅटियल ऑडियो आणि वर्चुअल 120-इंच सिनेमा स्क्रीनला सपोर्ट करते, ज्याला यूजर जेस्चर्सद्वारे कंट्रोल करू शकतात. हे मल्टी-डिव्हाइस कास्टिंग, इमर्सिव्ह डोम व्हिडिओ, 3D ई-स्पोर्ट्स व्ह्यूइंग, पीसी आणि मोबाइल गेम कास्टिंग आणि मल्टी-विंडो उत्पादकता यासह अनेक वैशिष्ट्यांना समर्थन देते. व्हिजन एक्सप्लोरर एडिशन अॅपल व्हिजन प्रो, मेटा क्वेस्ट 3 आणि सॅमसंगच्या आगामी XR हेडसेटशी स्पर्धा करेल.