
Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज... खरेदीची संधी सोडू नका
Vivo T5 Lite 44W 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी थेट 14 हजार रुपयांचे प्लॅट डिस्काऊंट ऑफर करत आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी झाली आहे. याव्यतिरिक्त स्मार्टफोनच्या खरेदीवर बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये मोठा एचडी+ एलसीडी डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. पावरफुल प्रोसेसरसह हा डिव्हाईसमध्ये इतर फीचर्स देखील मिळणार आहेत. ज्यामुळे यूजर्सचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होणार आहे. (फोटो सौजन्य: Vivo)
विवोच्या या स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टवर 33,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये या स्मार्टफोनची किंमत अत्यंत कमी झाली आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा विवो स्मार्टफोन केवळ 19,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच ग्राहकांना या स्मार्टफोनवर थेट 14 हजार रुपयांचे फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. तसेच या स्मार्टफोनवर काही खास बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत, ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक आणि फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्डसह या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2,900 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. या सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटनंतर या स्मार्टफोनची किंमत 17,099 रुपये झाली आहे. तसेच या डिव्हाईसवर खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध असणार आहेत. ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे.
स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.74-इंच एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 5G प्रोसेसर देखील मिळणार आहे. यासोबतच फोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे.
7000mAh बॅटरी अन् पावरफुल प्रोसेसर! Motorola च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका… जाणून घ्या किंमत
विवो स्मार्टफोनमध्ये 50MP चा सोनी एआय डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे, ज्यामुळे क्लियर फोटो आणि स्मूद व्हिडीओ कॉलची सुविधा मिळणार आहे. फोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएसवर चालते.