Vivo V60 vs OnePlus Nord 5: कोण गाजवणार मार्केट आणि कोण करणार स्मार्टफोन युजर्सच्या मनावर राज्य? जाणून घ्या कोण आहे खरा बादशाह
विवोने अलीकडेच त्यांच्या V-सीरीज अंतर्गत V60 स्मार्टफोन लाँच केला आहे. तर वनप्लसने देखील नवा स्मार्टफोन OnePlus Nord 5 लाँच केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन एकमेकांना टक्कर देत आहेत. पण या दोन्ही स्मार्टफोनपैकी चांगला स्मार्टफोन कोणता, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह कोणता स्मार्टफोन बेस्ट परफॉर्मंस ऑफर करतो, याबाबत आता जाणून घेऊया.
दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Vivo V60 ची सुरुवातीची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी 36,999 रुपये आहे. तर OnePlus Nord 5 च्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 32,499 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे किंमतीच्या बाबतीत दोन्ही स्मार्टफोनमध्ये केवळ 4 हजार रुपयांचा फरक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
वीवोच्या Vivo V60 या डिव्हाईसमध्ये 6.77-इंच क्वाड-कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, तर वनप्लस नॉर्ड 5 मध्ये थोडा मोठा 6.83-इंच AMOLED पॅनल दिला आहे. वीवोच्या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 5,000nits पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर केली जाते. तर वनप्लस 144Hz रिफ्रेश रेटसह 1,800nits पर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. OnePlus मधील रिफ्रेश रेट जास्त आहे, त्यामुळे स्मूथ स्क्रॉलिंग एक्सपीरियंस मिळू शकतो.
विवोच्या या डिव्हाईसमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेनरेशन 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर वनप्लस नॉर्ड 5 मध्ये जास्त पावरफुल स्नॅपड्रॅगन 8s जेनरेशन 3 चिपसेट देण्यात आला आहे. बेंचमार्क चाचण्यांवरून असेही दिसून येते की Nord 5 हा V60 पेक्षा चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. V60 ला AnTuTu वर 1 दशलक्ष स्कोअर मिळतात, तर OnePlus Nord 5 ला सुमारे 1.4 दशलक्ष स्कोअर मिळतात.
दोन्ही स्मार्टफोन त्यांच्या कॅमेरा क्वालिटीसाठी प्रचंड लोकप्रिय आहेत. Vivo V60 मध्ये Zeiss सह तयार करण्यात आलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा Sony IMX766 प्राइमरी सेंसर, 50-मेगापिक्सलचा Sony IMX882 टेलीफोटो लेंस आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेंस दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 50-मेगापिक्सल कॅमेरा आहे. वनप्लस नॉर्ड 5 मध्ये ड्यूल कॅमेरा सिस्टम ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन वाला 50-मेगापिक्सल Sony LYT-700 सेंसर आहे आणि 120-डिग्री फील्ड ऑफ व्यू वाला 8-मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Vivo च्या फोनमध्ये 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह मोठी 6,500mAh बॅटरी आहे, परंतु Nord 5 मध्ये आणखी चांगली 6,800mAh बॅटरी आहे परंतु ती फक्त 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.