Vivo Watch GT 2: संपता संपणार नाही बॅटरी! Vivo ने लाँच केली eSIM सपोर्टवाली जबरदस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत
स्मार्टफोन कंपनीने विवोने चीनमध्ये Vivo X300 सीरीज लाँच केली आहे. या स्मार्टफोनसोबतच कंपनीने हलके, दमदार आणि स्टायलिश असे Vivo TWS 5 ईअरबड्स देखील लाँच केले आहेत. या दोन गॅझेट्ससोबतच कंपनीने आणखी एक नवीन गॅझेट लाँच केलं आहे. हे गॅझेट म्हणजे नवं स्मार्टवॉच. कंपनीने चीनमध्ये स्मार्टफोन आणि ईअरबड्ससोबत नवीन स्मार्टवॉच देखील चीनमध्ये लाँच केलं आहे. हे नवीन स्मार्टवॉच Watch GT 2 या नावाने लाँच करण्यात आलं आहे.
Watch GT 2 या नव्या स्मार्टवॉचमध्ये 2.07-इंच रेक्टेंगुलर स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये 60Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 2,400 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. हे डिव्हाईस BlueOS 3.0 वर चालते. कंपनीने दावा केला आहे की, हे स्मार्टवॉच एकदा चार्ज केल्यानंतर 33 दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते. स्मार्ट वियरेबलचे eSIM व्हेरिअंट एकदा चार्ज केल्यानंतर 28 दिवसांची बॅटरी लाईफ ऑफर करते. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टवॉचच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर Vivo Watch GT 2 चे स्टँडर्ड ब्लूटूथ व्हेरिअंट CNY 499 म्हणजेच सुमारे 6,200 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. तर या डिव्हाईसच्या eSIM वाल्या व्हेरिअंटची किंमत CNY 699 म्हणजेच सुमारे 8,700 रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच फ्री ब्लू, ओरिजिन ब्लॅक, ओब्सीडियन ब्लॅक, शेल पाउडर आणि व्हाइट स्पेस कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 2.07 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. हे एक अल्ट्रा-नॅरो, एकसारखे बेजल, 432×514 पिक्सेल रेजोल्यूशन, 60 हर्ट्ज रिफ्रेश रेट ऑफर करते. यासोबतच या स्मार्टवॉचमध्ये 2,400 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. वॉचमध्ये तुम्हाला कस्टमाइजेबल वॉच फेससह इंटरचेंजेबल स्ट्रॅप देखील देण्यात आले आहे. स्मार्टवॉच ब्लू रिवर ऑपरेटिंग सिस्टम 3.0 वर आधारित आहे.
एवढंच नाहीतर या स्मार्टवॉचमध्ये ऑप्टिकल हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन सेंसरसह अनेक हेल्थ फीचर्स देखील देण्यात आले आहेत. यासोबतच या वॉचमध्ये तुम्हाला 100 हून अधिक प्रीसेट स्पोर्ट्स मोड देखील मिळणार आहेत. या स्मार्टवॉचमध्ये एक्सेलेरेशन सेंसर, जायरोस्कोप, जियोमॅग्नेटिक सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर आणि हॉल सेंसर देखील देण्यात आला आहे. याशिवाय हे स्मार्टवॉच 2ATM वॉटर रेजिस्टेंस रेटिंगसह लाँच करण्यात आले आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टवॉचमध्ये NFC आणि ब्लूटूथ 5.4 देण्यात आले आहे.