Vivo X300 Series Launch: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा... Vivo च्या नव्या स्मार्टफोनने उडवले सर्वांचे होश, इतकी आहे किंमत
वीवोने होम मार्केट चीनमध्ये Vivo X300 सीरीज लाँच केली आहे. ही एक फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज असून या सिरीजमध्ये कंपनीने Vivo X300 आणि Vivo X300 Pro हे दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या या दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek चा लेटेस्ट Dimensity 9500 SoC देण्यात आला आहे. विवोचे हे दोन्ही स्मार्टफोन्स Android 16 वर आधारित कंपनी लेटेस्ट OriginOS 6 यूआईवर चालतात. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Zeiss चा कॅमेरा आणि V3+ इमेज प्रोसेसिंग चिप दिली आहे. Vivo X300 स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सेल Samsung HPB प्रायमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनच्या प्रो व्हेरिअंटमध्ये 50-मेगापिक्सेल Sony LYT-828 प्राइमरी सेंसर दिलेला आहे.
Vivo X300 Pro मध्ये कंपनीने 85 mm 200 मेगापिक्सेल ZEISS APO टेलीफोटो कॅमेरा दिला आहे. ही लेंस कंपनीने सॅमसंग आणि मीडियाटेकसह मिळून तयार केली आहे. हे HPBlue मोठ्या आकाराचे सेंसर (1/1.4 inch) आहे, ज्याचे अपर्चर f/2.67 आहे. यासोबतच हे ZEISS T* कोटिंगसह येते, जो कलर प्यूरिटी आणि शार्पनेसच्या बाबतीत ZEISS APO सर्टिफिकेशन ऑफर करतो. CIPA 5.5 स्टेबलाइजेशन हाय मॅग्निफिकेशनच्या दरम्यान देखील रेजर शार्ट इमेज कॅप्चर करतात. (फोटो सौजन्य – X)
वीवोने हा कॅमेरा सेंसर Vivo X300 मध्ये देखील दिला आहे. ज्याचे अपर्चर f/1.68 आणि स्टेबलाइजेशन CIPA 4.5 आहे. X300 मध्ये हा टेलीफोटो कॅमेऱ्याऐवजी प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये टेलीफोटोसाठी सोनीचा 50MP लेंस देण्यात आले आहे.
Vivo X300 स्मार्टफोनमध्ये 6.31 इंच 1.5K+120Hz LTPO फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे, जो 1.5K LTPO OLED पॅनल आहे. हे HDR10+, Dolby Vision सपोर्टसह येतात, ज्याची पीक ब्राइटनेस 4,500 निट्स आहे. विवोचा हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या लेटेस्ट Dimensity 9500 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये इमेज प्रोसेसिंगसाठी V3+ चिप देण्यात आली आहे. हा फोन 16 जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1 टीबी पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह ऑफर केला जातो.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर या फोनमध्ये प्रायमरी कॅमेरा 200MP HPB सेंसर आहे, ज्याच्यासोबत 50MP JN1 आणि 50MP LYT-602 पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आहे. यासोबतच सेल्फीसाठी फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo X300 स्मार्टफोनमध्ये 6040mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. वीवोचा लेटेस्ट स्मार्टफोन अँड्रॉयड 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतो. हा Vivo फोन IP68/IP69 रेटिंग असलेल्या मेटल फ्रेमसह येतो. तो NFC, IR ब्लास्टर आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरला देखील सपोर्ट करतो.
Vivo X300 Pro मध्ये 6.78 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा 1.5K फ्लॅट BOE Q10+ LTPO OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन MediaTek Dimensity 9500 चिपसेट सह येतो, ज्यामध्ये LPDDR5x रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज देण्यात आला आहे. हा फोन लेटेस्ट Android 16 वर आधारित OriginOS 6 वर आधारित आहे. फोनमध्ये 50-मेगापिक्सल Sony LYT-828 प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 50-मेगापिक्सल Samsung JN1 अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो लेंस दिला आहे. हा फोन Zeiss’ 2.35× टेलीफोटो टेलीकन्वर्टर ऑप्शन एक्सेसरीजला देखील सपोर्ट करतो. Zeiss द्वारे समर्थित, कॅमेरा सिस्टम सुधारित फोटोग्राफीसाठी पोस्ट- आणि प्री-प्रोसेसिंग V3+ आणि Vs1 इमेजिंग चिप्सना समर्थन देते. याव्यतिरिक्त, फोनमध्ये सेल्फीसाठी 50-मेगापिक्सेल सॅमसंग JN1 सेन्सर आहे.
Vivo X300 Pro मध्ये 6,510mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. फोन इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी 3.2 Gen 1 टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. Vivo X300 पाच प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन फ्री ब्लू, कम्फर्टेबल पर्पल, प्युअर ब्लॅक आणि लकी कलर शेड्समध्ये उपलब्ध असेल. Vivo X300 Pro चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये वाइल्डरनेस ब्राउन, सिंपल व्हाइट, फ्री ब्लू आणि प्युअर ब्लॅक यांचा समावेश आहे.
12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 4,399 युआन म्हणजेच सुमारे 54,700 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 4,699 युआन म्हणजेच सुमारे 58,400 रुपये ठेवण्यात आली आहे. 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 4,999 युआन म्हणजेच सुमारे 62.100 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 5,299 युआन म्हणजेच सुमारे 65,900 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 5,799 युआन म्हणजेच सुमारे 72,900 रुपये ठेवण्यात आली आहे.
12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 5,299 युआन म्हणजेच सुमारे 65,900 रपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 5,999 युआन म्हणजेच सुमारे 74,600 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत 6,699 युआन म्हणजेच सुमारे 83,300 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB + 1TB सैटेलाइट कॉम्युनिकेशन एडिशनची किंमत 8,299 युआन म्हणजेच सुमारे 1,03,200 रुपये ठेवण्यात आली आहे.