डिझाईन अशी की पाहतच राहाल! Vivo च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 6000mAh बॅटरी आणि 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज
चीनी स्मार्टफोन ब्रँड Vivo ने त्यांचा नवीन आणि बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Vivo Y04s या नावाने इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे. लाँच करण्यात आलेला नवीन बजेट स्मार्टफोन LCD टचस्क्रीन, Unisoc प्रोसेसर, आणि Android 14 ने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 570 निट्स पीक ब्राइटनेस, एडेप्टिव रिफ्रेश रेट आणि 70% NTSC कलर गॅमट सपोर्ट देण्यात आला आहे.
Vivo Y04s स्मार्टफोन इंडोनेशियामध्ये IDR 13,99,000 म्हणजेच सुमारे 7,480 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एकाच स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर दोन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ज्यामध्ये क्रिस्टल पर्पल आणि जेड ग्रीन यांचा समावेश आहे. इंडोनेशियामध्ये, हा स्मार्टफोन विवोच्या अधिकृत स्टोअर, अकुलाकू, शोपी, ब्लीब्ली आणि टिकटॉक स्टोअरमधून खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.(फोटो सौजन्य – X)
Vivo Y04s एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 6.74-इंच HD+ LCD डिस्प्ले (1600×720 पिक्सल रेजोलूशन) आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz ते 90Hz दरम्यान एडजस्ट केला जाऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 570 निट्स पीक ब्राइटनेस आणि 260ppi पिक्सल डेंसिटी देण्यात आली आहे. फोनमध्ये Unisoc T612 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे आणि त्याला 4GB LPDDR4X RAM सह जोडण्यात आले आहे.
स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 64GB eMMC5.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला 1TB पर्यंत microSD कार्डसह वाढवले जाऊ शकते. फोनच्या बॅक पॅनलला Crystalline Matte डिझाईन आहे, ज्यामुळे फोनला प्रिमियम लुक मिळतो.
कॅमेरा सेटअपमध्ये मागील बाजूस 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि QVGA सेकंडरी लेन्स, LED फ्लॅशसह आहे. समोर 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा वॉटरड्रॉप-नॉचमध्ये बसवला आहे. कॅमेरा फीचर्समध्ये नाईट, पोर्ट्रेट, पॅनोरामा, स्लो मोशन आणि टाइम लॅप्स मोड्सचा समावेश आहे.
फोनमध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर देण्यात आले आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4G, डुअल-बैंड Wi-Fi, Bluetooth 5.2, USB Type-C, GPS, Beidou, GLONASS, आणि Galileo सपोर्ट देण्यात आला आहे. Vivo Y04s मध्ये 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W FlashCharge ला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.
Vivo Y04s ची किंमत किती आहे?
IDR 13,99,000 म्हणजेच सुमारे 7,480 रुपये
फोनमध्ये किती mAh बॅटरी देण्यात आली आहे?
6000mAh बॅटरी