Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय आहे Air Raid Siren? कोणत्या Technology चा केला जातो वापर? मोबाईलवरही मिळणार का अलर्ट? जाणून घ्या सर्वकाही

Air Raid Siren: उद्या 7 मे रोजी एक मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. एयर रेड सायरन एक विशेष प्रकारचा साउंड असतो. हा सायरन वाजवण्यासाठी विशेष टेक्नोलॉजीचा वापर केला जातो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 06, 2025 | 01:28 PM
काय आहे Air Raid Siren? कोणत्या Technology चा केला जातो वापर? मोबाईलवरही मिळणार का अलर्ट? जाणून घ्या सर्वकाही

काय आहे Air Raid Siren? कोणत्या Technology चा केला जातो वापर? मोबाईलवरही मिळणार का अलर्ट? जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव क्षणोक्षणी वाढत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून पाकिस्तानमधील लोकांनी शिक्षा देता यावी. याशिवाय पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानाला कठोर कारवाई करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. हे सर्व सुरु असतानाच पाकिस्तानमधील हॅकर्सनी भारतीय सैनिकांशी संबंधित स्कूलवर सायबर अटॅक केला आणि वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला. या सर्वाची शिक्षा पाकिस्तानला देण्यासाठी आता भारत सरकार प्रयत्न करत आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होणार की टळणार? AI ने दिलं धक्कादायक उत्तर! म्हणाला, युद्ध झालं तर…

या सर्व प्रयत्नावेळी भारतीय नागरिकांची सुरक्षा टिकून राहावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे. उद्या 7 मे रोजी एक मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एयर रेड वॉर्निंग सायरन वाजवला जाणार आहे. हा सायरन हवाई हल्ल्यावेळी वाजवला जातो. मात्र एयर रेड वॉर्निंग सायरन नक्की काय आहे, यामध्ये कोणत्या प्रकारच्या टेक्‍नोलॉजीचा वापर केला जातो, एयर रेड वॉर्निंग सायरन वाजवला जाईल त्यावेळी मोबाईलवर देखील अलर्ट दिला जाणार का, असे अनेक प्रश्न आता भारतीयांच्या मनात आहेत. चला तर मग आता या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)

एयर रेड सायरन काय आहे?

एयर रेड सायरन एक विशेष प्रकारचा साउंड असतो. ज्यावेळी एखादं संकट आपल्या आजूबाजूला असतं त्यावेळी हा सायरन वाजवला जातो. या संकटांमध्ये हवाई हल्ला, मिसाइल अटॅक यांचा समावेश आहे. कधीकधी नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही हा सायरन वाजवला जातो. हा सायरन सुमारे 60 सेकंदांपर्यंत वाजवला जातो. हा सायरन वाजल्यानंतर लोकांनी एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाणं अपेक्षित आहे.

सायरनमध्ये कोणत्या टेक्नोलॉजीचा वापर केला जातो?

नैसर्गिक आपत्ती, हवाई हल्ला, मिसाइल अटॅक अशा प्रकारची संकट जेव्हा समोर असतात त्यावेळी जगभरात हा सायरन वापरला जातो. हा सायरन वाजवण्यासाठी एयर, इलेक्‍ट्र‍िस‍िटी आणि इलेक्‍ट्रॉनिक टेक्नोलॉजीचा वापर केला जातो. अनेक देश फुगवता येणारे सायरन वापरतात. फिरत्या डिस्क ट्रॅपमध्ये छिद्र पाडून हवा सोडली जाते, ज्यामुळे आवाज निर्माण होतो.

7 मे ला भारतात वाजणार हवाई हल्ल्याचे सायरन, यूक्रेनमध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी केला जातोय या App चा वापर

अनेक देशांमध्ये विजेवर चालणारे सायरन वापरले जातात. यामध्ये एका मशीनमध्ये डायफ्रॉम किंवा हॉर्न लावला जातो, जो साऊंड काढतो. आजकाल, इलेक्ट्रॉनिक सायरन देखील वापरले जात आहेत, जे डिजिटल पद्धतीने वाजतात. त्यांच्यामध्ये स्पीकर्स बसवलेले आहेत. विकिपीडियावरील माहितीनुसार, सायरन रेडिओ फ्रिक्वेन्सीशी देखील जोडले जाऊ शकतात. उद्या भारतात वाजणाऱ्या सायरनमध्ये कोणत्या टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार याबाबत अद्याप माहिती नाही.

मोबाईलवरही अलर्ट मिळणार का?

लोकांमध्ये अशी चर्चा आहे की, मॉक ड्रिलदरम्यान जेव्हा सायरन वाजवला जाणार आहे, तेव्हा मोबाईल देखील वाजला जाईल. ब्रिटेनमध्ये अशा सिस्‍टमची चाचणी करण्यात आली आहे. इथे दोन वर्षांपूर्वी मोबाईलवर इमरजेंसी अलर्ट सिस्‍टमची चाचणी करण्यात आली होती. चाचणीदरम्यान 4जी आणि 5जी फोन्सवर मेसेज पाठवण्यात आले. यावेळी एक बीप वाजला आणि मोबाईल वायब्रट झाला होता. फोन सायलेंट मोडमध्ये असताना देखील वायब्रट झाला होता. यावेळी 10 सेकंदांपर्यंत बीप वाजवण्यात आला होता.

Web Title: What is air raid siren how it works which technology is used know everything in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Pahalgam Terror Attack
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
1

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
2

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
3

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
4

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.