Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: फास्ट, रिवर्स, वायरलेस आणि बायपास चार्जिंगमध्ये नेमका फरक काय? 99 टक्के लोकांना माहीती नाही, जाणून घ्या सविस्तर

Smartphone Tips: सध्या बाजारात स्मार्टफोनसाठी बाजारात विविध प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत. पण यातील कोणता चार्जर बेस्ट आहे आणि युजर्ससाठी फायद्याचा ठरणार आहे, याबाबत अनेकांना माहिती नसते. जाणून घ्या सविस्तर...

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 16, 2025 | 02:17 PM
Tech Tips: फास्ट, रिवर्स, वायरलेस आणि बायपास चार्जिंगमध्ये नेमका फरक काय? 99 टक्के लोकांना माहीती नाही, जाणून घ्या सविस्तर

Tech Tips: फास्ट, रिवर्स, वायरलेस आणि बायपास चार्जिंगमध्ये नेमका फरक काय? 99 टक्के लोकांना माहीती नाही, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या डिजीटील काळात स्मार्टफोन केवळ कॉलिंग आणि मेसेजिंगसाठीच नाही तर इतर अनेक कामांसाठी वापरला जातो. स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही फोटोग्राफी करू शकता, व्हिडीओ बनवू शकता. याशिवाय स्मार्टफोनद्वारे पैसे कमावण्याचे देखील अनेक उपाय आहेत. खरं तर स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या आयुष्यात स्मार्टफोन जितका महत्त्वाचा आहे, तितकीच त्याची चार्जिंग टेक्नोलॉजी देखील महत्त्वाची आहे.

एकाचवेळी चार्ज होणार स्मार्टफोन आणि स्मार्टवॉच! OnePlus घेऊन आला युजर्सच्या समस्येचं समाधान, 2-इन-1 SUPERVOOC चार्जिंग केबल लाँच..

पूर्वी आपल्याला सतत आपला स्मार्टफोन चार्ज करावा लागत होता. मात्र आता असं नाही. बाजारात असे अनेक पावरफुल चार्जर उपलब्ध आहेत, ज्याच्या मदतीने आपण अगदी काही क्षणात आपला स्मार्टफोन चार्ज करू शकतो आणि दिवसभर स्मार्टफोनचा वापर करू शकतो. बाजारात स्मार्टफोनच्या चार्जरचे विविध प्रकार उपलब्ध आहेत, ज्यामध्ये फास्ट, रिवर्स, वायरलेस आणि बायपास चार्जिंग यांचा समावेश आहे. पण यातील कोणता चार्जर आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतो आणि प्रत्येक चार्जरमध्ये नेमका फरक काय आहे, यासाठी अनेकांच्या मनात गोंधळ आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

फास्ट चार्जिंग

फास्ट चार्जिंग म्हणजेच कमी वेळात स्मार्टफोन चार्ज करण्याचे तंत्रज्ञान. आधी जेव्हा फोनला 100% चार्ज करण्यासाठी दीड ते 2 तासांचा कालावधी लागत होता, त्याच कामासाठी आता केवळ 30 ते 40 मिनिटे लागतात. पण यासाठी फोन आणि चार्जर दोन्हीमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. केबल देखील ओरिजिनल किंवा फास्ट चार्जिंग वाली असणं आवश्यक आहे.

रिवर्स चार्जिंग

रिवर्स चार्जिंग म्हणजेच तुमचा फोन पॉवर बँक बनतो आणि तुम्ही त्याद्वारे इतर कोणतेही डिव्हाइस चार्ज करू शकता. खरं तर हे तंत्रज्ञान खूप फायदेशीर ठरतं. Wired Reverse Charging आणि Wireless Reverse Charging असे या तंत्रज्ञानाचे दोन प्रकार आहेत. प्रवास करताना तुमच्या मित्राचा फोन बंद पडला तर अशावेळी तुम्ही तुमच्या फोनच्या मदतीने मित्राचा फोन चार्ज करू शतता. याशिवाय हे तंत्रज्ञान स्मार्टवॉच, इअरबड्स सारख्या गोष्टी चार्ज करण्यासाठी देखील मदत करते.

वायरलेस चार्जिंग

वायरलेस चार्जिंगमध्ये चार्जिंग पॅडवर फोन ठेवल्याने बॅटरी चार्ज होते. यासाठी कोणत्याही केबलची आवश्यकता नाही. यामुळे आता केबल अडकण्याचा आणि तुटण्याचा त्रास आता संपला आहे. ऑफिस किंवा बेडसाईड टेबलमध्ये ठेवण्यासाठी सोयीस्कर वायरलेस चार्जिंग तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये चार्जिंग स्पीड थोडी कमी असते.

केवळ 3 स्टेप्स… काही क्षणातच तुम्ही अपलोड केलेला फोटो बनणार व्हिडीओ! Google Gemini करणार अनोखी जादू

बायपास चार्जिंग

गेमिंग करताना किंवा हेवी यूज दरम्यान फोन गरम होण्यापासून रोखण्यासाठी, बायपास चार्जिंग बॅटरी बायपास करून थेट प्रोसेसरला पॉवर देते. गेमिंग दरम्यान फोन लवकर गरम होत नाही, बॅटरी लाइफ वाढते आणि जास्त वेळ वापर करूनही कामगिरी चांगली राहते असे बायपास चार्जिंगचे अनोखे फायदे आहेत.

Web Title: What is the difference between fast reverse wireless and bypass charging tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 02:17 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

54 तास बॅटरी लाइफ, IP55 वॉटर रेझिस्टन्स आणि उत्तम साऊंड क्वालिटीसह OPPO Enco Buds 3 Pro च्या विक्रीला सुरुवात
1

54 तास बॅटरी लाइफ, IP55 वॉटर रेझिस्टन्स आणि उत्तम साऊंड क्वालिटीसह OPPO Enco Buds 3 Pro च्या विक्रीला सुरुवात

iPhone 17 Series launch: लाईव्ह ट्रांसलेशन फीचरसह Apple चे AirPods Pro 3 लाँच, कॉम्पॅक्ट डिझाइनने सुसज्ज
2

iPhone 17 Series launch: लाईव्ह ट्रांसलेशन फीचरसह Apple चे AirPods Pro 3 लाँच, कॉम्पॅक्ट डिझाइनने सुसज्ज

Free Fire Max: एक्सक्लूसिव Outfit-Pet मोफत मिळवण्याची हीच आहे संधी, आत्ताच अनलॉक करा नवे कोड
3

Free Fire Max: एक्सक्लूसिव Outfit-Pet मोफत मिळवण्याची हीच आहे संधी, आत्ताच अनलॉक करा नवे कोड

WhatsApp Web Down :लॅपटॉप किंवा पीसी हॅग नाही तर WhatsApp Web डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
4

WhatsApp Web Down :लॅपटॉप किंवा पीसी हॅग नाही तर WhatsApp Web डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.