Sunita Williams Return: काय आहे Starliner ची कहाणी, तो यान ज्यामुळे सुनिता विल्यम्स 9 महिने अंतराळात अडकली
अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांनी पृथ्वीवर परतले आहेत. बुधवारी पहाटे स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलद्वारे त्यांनी फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर यशस्वी लँडिंग केले. गेल्या 9 महिन्यांपासून दोन्ही अंतराळवीर अंतराळात अडकले होते. मात्र आता ते पुन्हा भारतात परतले आहेत.
5 जून 2024 रोजी, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर बोईंग स्टारलाइनर अंतराळयानातून अंतराळात रवाना झाले. दोघेही 8 दिवसांनी म्हणजेच 13 जून रोजी पुन्हा पृथ्वीवर परतणार होते. स्टारलाइनर अंतराळयानामुळे दोघेही 9 महिने अंतराळ स्थानकावर अडकले होते. या अंतराळयानाच्या बांधणीपासून ते उड्डाणापर्यंत, यात अनेक अडचणी होत्या. पण या अंतराळयानात नेमक्या काय समस्या होत्या, याबद्दल अनेकांना माहिती नाही. आता आम्ही तुम्हाला या यानाची संपूर्ण कहाणी सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – X)
ऑक्टोबर 2011 मध्ये नासाने बोईंगला हे अंतराळयान तयार करण्यासाठी हिरवा कंदील दिला. स्टारलाइनचं काम पूर्ण होण्यासाठी सुमारे 6 वर्षे लागली. 2017 मध्ये तयार करण्यात आलेल्या स्टारलाइनच्या चाचण्या 2019 पर्यंत सुरू राहिल्या. पण या उड्डाणांमध्ये कोणताही मानव सहभागी नव्हता. ही मानवरहित उड्डाणे होती.
पहिली मानवरहित कक्षीय उड्डाण चाचणी 20 डिसेंबर 2019 रोजी घेण्यात आली. पण दोन सॉफ्टवेअर बिघाडांमुळे हे यान दुसऱ्या कक्षेत पोहोचले. अंतराळ स्थानकाशी डॉकिंग करता आले नाही. दोन दिवसांनंतर ते न्यू मेक्सिकोमधील व्हाईट सँड्स मिसाईल रेंजवर उतरले. दुसऱ्या मानवरहित उड्डाणाची चाचणी 6 एप्रिल 2020 रोजी घेण्यात आली. या चाचणीचा उद्देश यानाला अंतराळ स्थानकात जायचे होते, डॉकिंग करावे लागले, यानंतर परत यावे लागले असा होता. मात्र काही कारणामुळे हे प्रक्षेपण थोडे पुढे ढकलण्यात आले. यानंतर ऑगस्ट 2021 मध्ये लाँचिंगसाठी तयारी करण्यात आली होती. पण नंतर अंतराळयानाच्या 13 प्रोपल्शन व्हॉल्व्हमध्ये काही कमतरता आढळून आल्या. त्यामुळे बोईंगने या अंतराळयानाचं बांधकाम पुन्हा करण्यास सुरुवात केली.
अंतराळयानाचे पुन्हा बांधकाम करण्यात आल्यानंतर मे 2022 मध्ये चाचणी उड्डाणाची तयारी करण्यात आली. 19 मे 2022 रोजी स्टारलाइनरने पुन्हा उड्डाण केले. यावेळी त्यात दोन बनावट अंतराळवीर बसवण्यात आले होते. परंतु ऑर्बिटल मॅन्युव्हरिंग आणि अॅटिट्यूड कंट्रोल सिस्टम थ्रस्टर्स अयशस्वी झाले. यानंतर 22 मे 2022 रोजी स्टारलाइनर अंतराळ स्थानकाशी जोडले गेले.
25 मे 2022 रोजी, स्टारलाइनर अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परतले. पुन्हा प्रवेश करताना अंतराळयानाच्या नेव्हिगेशन प्रणालीमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे संवादामध्ये देखील समस्या निर्माण झाली. तसेच जीपीएस उपग्रहाशी संपर्क तुटला. पण बोईंगने म्हटले की हे सामान्य आहे.
तिसरे मानवयुक्त उड्डाण 2017 मध्ये नियोजित करण्यात आले होते. परंतु अनेक समस्या आणि कारणांमुळे हा उड्डाणाला उशीर झाला आणि हे उड्डाण 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. बोईंगने सांगितले होते की, हे उड्डाण 1 जून 2023 पर्यंत पुढे ढकलत आहोत. 7 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीने सांगितले की अंतराळयानातील समस्या संपल्या आहेत. त्यामुळे पुढील उड्डाण 6 मे 2024 रोजी नियोजित करण्यात आले आहे.
पण नंतर हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. कारण अॅटलास रॉकेटमध्ये ऑक्सिजन व्हॉल्व्हमध्ये काही समस्या निर्माण झाली होती. यानंतर अंतराळयानात हेलियमला गळती लागल्यामुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. अखेर, 5 जून रोजी, सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर हे दोघे अंतराळयान घेऊन अवकाशात रवाना झाले. दोघेही अंतराळयात सुखरुप पोहोचले, मात्र यानंतर पुन्हा अंतराळयानात समस्या निर्माण झाल्या. थोडक्यात, स्टारलाइनर हे अंतराळयान अनेक समस्यांनी भरलेले होते.