
WhatsApp च्या अडचणी वाढण्याची शक्यता, भारतात बॅन होणार का? सीसीआयकडून तपास सुरु
लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपला भारतात अडचणी येऊ शकतात. मेटाच्या मालकीच्या प्लॅटफॉर्मना समस्या येऊ शकतात. 2021 मध्ये सादर करण्यात आलेले प्रायव्हसी पॉलिसी हे या वादाचे मूळ आहे. 2021 मध्ये, कंपनीने व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा त्याच्या मूळ कंपनी मेटाला शेअर करण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. व्हॉट्सॲपच्या या निर्णयावर रेगुलेटरीजनेही प्रश्न उपस्थित केले होते.
हेदेखील वाचा- WhatsApp चॅटची थीम बदला किंवा लो लाईटमध्ये व्हिडीओ कॉल करा, प्रत्येक काम होणार मजेदार!
व्हॉट्सॲप मेटासोबत त्यांचा डेटा शेअर करून वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत आहे आणि व्हॉट्सॲप भारताच्या आयटी कायद्यांचे पालन करत नसल्याचा आरोप केला जात आहे. 2021 पासून सुरु असणाऱ्या या प्रकरणात आता सीसीआय निर्णय देण्याची शक्यता आहे. या निर्णय व्हॉट्सॲपच्या विरोधात असल्यास व्हॉट्सॲपला भारतात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे व्हॉट्सॲप भारतात बॅन होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)
व्हॉट्सॲप हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सॲप आपल्या युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी सतत नवनवीन फीचर्स लाँच करत असते. प्रत्येक फीचर नंतर युजर्सचा व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव अधिक मजेदार होतो. व्हॉट्सॲपच्या प्रत्येक फीचरनंतर व्हॉट्सॲपवरील चॅटिंग आणखी मजेदार होते.
भारतात बऱ्याच दिवसांपासून व्हॉट्सॲपविरोधात चौकशी सुरू आहे. स्पर्धा आयोग (सीसीआय) या प्रकरणाची चौकशी करत आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार आता सीसीआय या तपासावर आपला निर्णय देऊ शकते. प्रायव्हसी पॉलिसीमुळे व्हॉट्सॲपवर लवकरच आदेश जारी केला जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर सीसीआय लवकरच निर्णय देणार आहे. त्याचा जवळपास पूर्ण मसुदा तयार झाला आहे.
सीसीआयच्या आधी, डायरेक्टर जनरल ऑफ इन्क्वायरी (DG) ने व्हॉट्सॲप बद्दल सांगितले होते की, कंपनी चुकीच्या पद्धतीने मार्केटमध्ये आपल्या उपस्थितीचा फायदा घेत आहे. डायरेक्टर जनरल ऑफ इन्क्वायरी म्हणाले की, मेटा चुकीची धोरणे स्वीकारून बाजारात मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. डीजींनी सीसीआयला सादर केलेल्या अहवालात आणखी अनेक गोष्टींचा उल्लेख केला होता.
हेदेखील वाचा- WhatsApp Story Update: व्हॉट्सॲपवर आलं नवीन अपडेट, इंस्टाग्राम स्टोरीप्रमाणे व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये मिळणार ‘हे’ खास फीचर
या संपूर्ण प्रकरणावर व्हॉट्सॲपने प्रतिक्रिया दिली आहे की, सध्या सीसीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. तपासात जो निर्णय येईल. आम्ही त्याचा आदर करू. यावर सध्या काहीही सांगता येणार नाही. निर्णयाची वाट पाहणे योग्य ठरेल, असे व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने सांगितले.
आता अनेकांच्या मनात प्रश्न येत आहे की भारतात व्हॉट्सॲपवर बंदी घालणार का? यावेळी याचे उत्तर देणे खूप घाईचे आहे. व्हॉट्सॲपला त्याच्या पॉलिसीमुळे दंड भरावा लागू शकतो आणि त्याचे धोरण बदलण्यासही सांगितले जाऊ शकते. पण सध्या तुम्ही व्हॉट्सॲप वापरू शकता. व्हॉट्सॲपवर सीसीआय काय निर्णय देते हे पाहणे बाकी आहे.