अरेच्चा! बायकोने सांगितलेली भाजी आणायला विसरलात? नो टेंशन, आता WhatsApp देणार तुम्हाला मेसेजचा 'Reminder'
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म WhatsApp ने आतापर्यंत अनेक मजेदार फीचर्स रोलआऊट केले आहेत. काही फीचर्स पर्सनल चॅटसाठी तर काही फीचर्स ग्रुप चॅटसाठी रोलआऊट करण्यात आले आहेत. WhatsApp ने आतापर्यंत रिलीज केलेल्या प्रत्येक फीचरचा फायदा युजर्सना झाला आहे. यातील काही फीचर्स तर इतके मजेदार आहेत की युजर्स त्यांचा सतत वापर करत असातात. आता देखील WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी असंच एक मजेदार फीचर घेऊन येत आहे. कंपनी एक असं फीचर घेऊन येत आहे, ज्यामुळे युजर्सचा WhatsApp वापरण्याचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक सुधारणार आहे आणि मजेदार होणार आहे.
WhatsApp लवकरच त्यांच्या युजर्ससाठी एक अनोखं रिमाईंड मी फीचर रोलआऊट करण्याच्या तयराती आहे. ज्या लोकांच्या लक्षात राहत नाही किंवा जे लोकं सतत काम विसरतात, त्यांच्यासाठी हे फीचर रोलआऊट केलं जात आहे. WhatsApp च्या या आगामी फीचरमध्ये नक्की काय असणार, ते कसं काम करणार याबाबत आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
समजा जर तुम्हाला बायकोने भाजी आणण्यासाठी मेसेज केला आहे आणि घरी जाताना तुम्ही भाजी घेऊन जायचं विसरलात तर… पण आता असं होणार नाही. कारण आता WhatsApp तुम्हाला महत्त्वाच्या मेसेजचे रिमाईंडर देणार आहे. जर तुम्हाला बायकोने भाजी आणण्यासाठी मेसेज केला, तर तुम्ही त्या मेसेजसाठी रिमाईंडर लावू शकता आणि घरी जाताना भाजी घेऊन जाऊ शकता. ज्यामुळे तुमची बायको खुश होईल आणि भांडण देखील होणार नाही. WhatsApp यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. व्यस्त जीवनशैली आणि प्रचंड चॅट्स यामुळे अनेकांना विसरण्याची सवय लागली आहे, अशाच लोकांसाठी आता WhatsApp एक नवीन फीचर घेऊन येत आहे. WhatsApp ने त्यांच्या Android बीटा वर्जन 2.25.21.14 मध्ये एक अत्यंत गरजेचं असं Remind Me फीचर रोलआऊट करण्याची घोषणा केली आहे.
“Remind Me” एक असं फीचर आहे, जे युजर्सना कोणत्याही महत्त्वाच्या मेसेजचे रिमाईंडर लावण्याची सुविधा देतात. जर कोणताही महत्त्वाचा मेसेज आला तर तुम्ही त्यावर एक रिमाइंडर सेट करू शकता आणि WhatsApp स्वतः तुम्हाला ठरावीक वेळी नोटिफिकेशनद्वारे या मेसेजची आठवण करून देईल. विशेष म्हणजेच हे फीचर केवळ टेक्स्ट मेसेजवरच नाही तर, इमेज, वीडियो, GIF, ऑडियो आणि डॉक्यूमेंट्सवर देखील काम करतं. तुम्ही मेसेजसाठी 2 तास, 8 तास, 24 तास आणि कस्टम टाइमसाठी रिमाईंडर लावू शकता.
ज्या मेसेजवर तुम्हाला रिमाइंडर सेट करायचा आहे त्या मेसेजवर लाँग प्रेस करा. वर बेल आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा. एक मेनू उघडेल ज्यामध्ये तुम्हाला वेळ निवडण्याचे पर्याय मिळतील. एकदा सेट केल्यानंतर, तुम्हाला सेट केलेल्या वेळेवर WhatsApp कडून नोटिफिकेशन मिळेल. रिमाइंडर डिलीट करण्यासाठी, त्याच मेसेजवर पुन्हा क्लिक करा आणि रिमाइंडर डिलीट करा वर क्लिक करा.
स्टार किंवा पिन चॅटच्या विपरीत, हे फीचर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन पाठवते. कोणतेही महत्त्वाचे उत्तर, डॉक्यूमेंट किंवा माहिती आता वेळेवर रिमाईंडर पाठवलं जाणार आहे.