WhatsApp घेऊन येतोय नवीन फीचर्स, आता युजर्सची सिक्योरिटी होणार अधिक पावरफुल! जाणून घ्या सविस्तर
इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp चे जगभरात लाखो युजर्स आहे. WhatsApp त्यांच्या युजर्सना चॅट करण्याची, व्हॉइस कॉल करण्याची आणि व्हिडिओ कॉल करण्याची परवानगी देते. लोकांचा WhatsApp वापरण्याचा अनुभव चांगला व्हावा यासाठी कंपनी सतत नवीन वैशिष्ट्ये सादर करत राहते. आता देखील कंपनीने त्यांच्या आगामी WhatsApp फीचर्सची घोषणा केली आहे.
2025 च्या पहिल्या तीन महिन्यांत, WhatsApp ने अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत आणि येणाऱ्या काळात आणखी फीचर्स आणण्यावर काम करत आहे. येणाऱ्या नवीन अपडेटमध्ये विशेषतः युजर्ससाठी कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग अनुभव सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय युजर्सची सिक्योरिटी कशा प्रकरे वाढवली जाऊ शकते, याचा देखील विचार केला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
WABetainfo वेबसाइटने WhatsApp वर येणाऱ्या या फीचरबद्दल माहिती शेअर केली आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या WhatsApp च्या नवीनतम बीटा आवृत्तीमध्ये सुधारणा होणार आहेत, जे दर्शविते की WhatsApp विशेषतः व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलसाठी तीन नवीन फंक्शन्स जोडत आहे. सध्या, ही वैशिष्ट्ये बीटा युजर्ससाठी उपलब्ध आहेत. लवकरच हे फीचर्स सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
WhatsApp वर येणारी एक नवीन फीचर म्हणजे म्यूट बटण फीचर. हे फीचर युजर्सना येणारे व्हॉइस कॉल म्यूट करण्याची अनुमती देईल. याचा अर्थ असा की युजर्स आता त्यांचा मायक्रोफोन म्यूट ठेवून कॉलला उत्तर देऊ शकतात. नवीन अपडेटसह, युजर्सना व्हिडिओ कॉलला उत्तर देण्यापूर्वी त्यांचा व्हिडिओ थांबवण्याचा पर्याय असेल, ज्यामुळे प्रक्रिया आणखी सोपी होईल. पूर्वी, युजर्स कॉल आल्यानंतर कॅमेरा बंद करण्याचा पर्याय स्क्रिनवर दिसत होता, जे थोडे त्रासदायक असू शकते. याशिवाय, WhatsApp लवकरच व्हिडिओ कॉल दरम्यान इमोजी रिअॅक्शन्स आणण्याची योजना आखत आहे, जेणेकरून युजर्स बोलत असताना त्यांच्या भावना त्वरित व्यक्त करू शकतील.
रिपोर्ट्सनुसार, WhatsApp एका नवीन प्रगत चॅट प्रायव्हसी फीचरवर काम करत आहे जे युजर्सना त्यांच्या चॅट्स आणि मीडिया शेअरिंगवर अधिक नियंत्रण देईल. यामुळे युजर्सना ठरवता येईल की त्यांनी इतरांसोबत शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओ रिसीव्हरच्या फोन गॅलरीमध्ये आपोआप सेव्ह केले जाऊ नयेत. हे फीचर युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते . हे वैशिष्ट्य तुमचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही पाठवलेला फोटो किंवा व्हिडिओ कोणीही त्यांच्या गॅलरीत सेव्ह करू नये, तर हे फीचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
WABetaInfo नुसार, WhatsApp प्रगत चॅट प्रायव्हसी फीचर आणण्यावर काम करत आहे. हे अँड्रॉइड अॅपच्या WhatsApp बीटा आवृत्ती 2.25.10.4 मध्ये दिसून आले आहे. हे फीचर ऐच्छिक असू शकते आणि अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते चालू किंवा बंद करता येते असे सांगितले जात आहे.