हिऱ्यांनी जडलेला iPhone पाहून तुमचेही डोळ दिपतील! अशी आहे खास डिझाईन, किंमत पाहून तुमचंही डोकं चक्रावेल
जगभरात आयफोन आणि अँड्रॉईड असे दोन्ही स्मार्टफोन युजर्स आहेत. प्रत्येकाकडे असणाऱ्या स्मार्टफोनची कंपनी, किंमत आणि मॉडेल जरी वेगळे असेल तरी स्मार्टफोन तयार करण्यासाठी वापरले जाणारे धातू सारखेच असतात. तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींचा स्मार्टफोन पाहू शकता. त्यांच्या आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये फार फरक नसेल. त्यामुळे स्मार्टफोनची कंपनी वगळली तर आपल्या सर्वांकडे सारखेच स्मार्टफोन्स आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. पण हे सामान्य स्मार्टफोन्स सोडून एखादा महागडा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हिऱ्यांनी जडलेल्या आयफोनचा विचार करू शकता. या हिऱ्यांनी जडलेल्या आयफोनची किंमत सामान्य आयफोनपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.
केवळ 6 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Redmi A5; 5200mAh बॅटरीसह मिळणार हे स्पेशल फीचर्स
स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज कस्टमाइझ करणाऱ्या लक्झरी ब्रँड कॅविअरने त्यांच्या एका नवीनतम अल्ट्रा-लक्झरी निर्मितीबद्दल माहिती दिली आहे. कंपनीने त्यांच्या कस्टम iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चे अनावरण केले आहे. हे दोन्ही स्मार्टफोन पॅरिसमधील नोट्रे डेम डी पॅरिस कॅथेड्रल चर्चपासून प्रेरित आहेत. असे म्हटले जाते की हे चर्च बांधण्यासाठी 200 वर्षे लागली. (फोटो सौजन्य –Pinterest)
दोन्ही मर्यादित आवृत्तीचे स्मार्टफोन आहेत ज्यात 18 कॅरेट व्हाईट गोल्ड वापरले गेले आहे. स्मार्टफोनच्या मागील पॅनलमध्ये कॅथेड्रलच्या जगप्रसिद्ध गुलाबाच्या खिडकीपासून प्रेरित एक आकर्षक डिझाइन आहे. या स्मार्टफोन्सचे लोगो लाखो रुपयांच्या हिऱ्यांनी जडवलेले आहेत. कंपनीच्या मते, हा आतापर्यंतच्या सर्वात खास आयफोनपैकी एक आहे. तसेच, या आयफोन्सचे फक्त 16 युनिट्स बनवले गेले आहेत. त्यामुळे या आयफोनची खरेदीदारांची संख्या देखील अत्यंत मर्यादित असणार आहे.
गिझमोचाइनाच्या अहवालानुसार, फोनच्या मागील पॅनलवर थ्री-डाइमेंशनल गॉथिक-स्टाइल आहे. फोनच्या मागील पॅनलच्या मध्यभागी नोट्रे डेमच्या प्रसिद्ध खिडकीची रचना दिसते. याव्यतिरिक्त, आयफोनमध्ये हस्तनिर्मित सोन्याचा Apple लोगो आहे. अॅपलचा लोगो 18 कॅरेट पांढऱ्या सोन्यापासून बनलेला आहे. त्याच्या डिझाइनचे सौंदर्य वाढवण्यासाठी, स्मार्टफोनच्या Apple लोगोमध्ये 59 हिरे जडवले आहेत.
आता हिऱ्यांनी जडलेल्या या आयफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या आयफोनची किंमत साध्या आयफोनपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे. या आयफोनची सुरुवातीची किंमत 104,490 डॉलर म्हणजेच सुमारे 89 लाख रुपये आहे. म्हणजेच iPhone 16 Pro 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 104,490 डॉलर म्हणजेच सुमारे 89 लाख रुपये आहे. टॉप-टियर 1TB iPhone 16 Pro Max ची किंमत 115,490 डॉलर म्हणजेच सुमारे 98 लाख रुपये आहे.