WhatsApp वर पर्सनल फोटो शेअर करताना 'हे' फीचर वापरा (फोटो सौजन्य - pinterest)
जगभरातील आवडतं फोटो शेअरिंग ॲप WhatsApp ने हल्लीच त्यांच्या युजर्ससाठी काही नवीन फिचर्स लाँच केले आहेत. WhatsApp चे सर्वच नविन फिचर्स युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. WhatsApp चा वापर व्हॉईस कॉल किंवा व्हिडिओ कॉल करण्यापेक्षा जास्त मॅसेज आणि फोटो किंवा फाईल्स शेअर करण्यासाठी केला जातो. युजर्सना त्यांचे पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना WhatsApp एक सिक्युरीटी असलेला ॲप वाटतो. त्यामुळे युजर्स बिंदास WhatsApp द्वारे त्यांचे पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतात. पण आपले पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना आपल्याला नेहमी एक भीती असते ती म्हणजे आपले फोटो लीक तर होणार नाही ना?
हेदेखील वाचा- WhatsApp वर Meta AI व्हॉईससह आले एकूण 5 नवे फीचर! युजर्सचा अनुभव पूर्णपणे बदलणार
फोटो किंवा एखादा मेसेज आपण शेअर केल्यानंतर समोरची व्यक्ती तो फोटो सेव्ह करून ठेवू शकते किंवा आपल्या मॅसेजचा स्क्रीन शॉट कडून ठेवू शकते. याच सगळ्या प्रश्नांवर WhatsApp कडे उपाय आहे. हा उपाय म्हणजे WhatsApp चे व्ह्यू वन्स फिचर. तुम्हाला जेव्हा तुमचा पर्सनल फोटो आणि व्हिडिओ शेअर करायचा असेल तेव्हा तुम्ही WhatsApp च्या व्ह्यू वन्स फिचरचा वापर करू शकता.
आपल्याला WhatsApp वर खाजगी किंवा गोपनीय फोटो शेअर करायचा असतो. अशा परिस्थितीत हा फोटो लीक होण्याची भीती कायम आहे. तुमच्या ह्या भीतीवरचा उपाय म्हणजे WhatsApp चे व्ह्यू वन्स फीचर. WhatsApp वर व्ह्यू वन्स प्रायव्हसी फीचरची सुविधा उपलब्ध आहे. जेव्हा तुम्हाला दुसऱ्या WhatsApp युजरसोबत खाजगी फोटो शेअर करायचा असेल तेव्हा तुम्ही व्ह्यू वन्स बटणावर टॅप करू शकता. जेव्हा युजर्स व्ह्यू वन्स बटणावर टॅप करतात, तेव्हा इतर युजर्सना हा फोटो त्याच्या फोनवर फक्त एकदाच पाहता येईल.
हेदेखील वाचा-WhatsApp DP सोबत दिसणाऱ्या QR Code चं नक्की काम काय? जाणून घ्या सविस्तर
समोरचा WhatsApp युजर जेव्हा पहिल्यांदा हा फोटो ओपन करतो त्यानंतर पुन्हा हा फोटो ओपन होऊ शकत नाही. तसेच ज्या युजरने हा फोटो शेअर केला आहे तो युजरसुध्दा एकदा फोटो शेअर केल्यानंतर पुन्हा ओपन करू शकत नाही. WhatsApp च्या व्ह्यू वन्स फीचरची खासियत म्हणजे हा फोटो ज्या दुसऱ्या WhatsApp यूजरसोबत शेअर केला जात आहे तो कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला हा फोटो पाठवू शकत नाही. दुसरा WhatsApp युजर या फोटोचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. तसेच हा फोटो फॉरवर्ड देखील करता येणार नाही.
फीचरसह फोटो ओपन होताच स्क्रीन लॉक होते. स्क्रीन लॉक झाल्याचा अर्थ असा आहे की हा फोटो कोणत्याही प्रकारे लीक होऊ शकत नाही. त्यामुळे WhatsApp च्या व्ह्यू वन्स फीचरमध्ये शेअर करण्यात आलेल्या फोटोला अत्यंत सिक्युरीटी दिली जाते, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.