Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोणती कंपनी देते सर्वाधिक सॉफ्टवेअर अपडेट? तुमचा फोन टॉप 5 ब्रँडमध्ये आहे का, जाणून घ्या

स्मार्टफोनच्या वाढत्या गरजेमुळे कंपन्या देखील त्यांचे नवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. कोणाचाही फोन सहज हॅक झाला जाऊ शकतो. अशा काळात Cyber Security महत्त्वाची ठरते. युजर्सच्या डाटाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने कंपन्या सॉफ्टवेअर अपडेट्सकडे लक्ष देत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 13, 2024 | 11:00 PM
कोणती कंपनी देते सर्वाधिक सॉफ्टवेअर अपडेट? तुमचा फोन टॉप 5 ब्रँडमध्ये आहे का, जाणून घ्या

कोणती कंपनी देते सर्वाधिक सॉफ्टवेअर अपडेट? तुमचा फोन टॉप 5 ब्रँडमध्ये आहे का, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:

सध्या असा एकही व्यक्ति नसेल जो स्मार्टफोनचा वापर करत नाही. आपल्या प्रत्येकाला स्मार्टफोनची प्रचंड गरज असते. स्मार्टफोनशिवाय आपली कामं अडू शकतात. आता स्मार्टफोन हे केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नाही, तर आपल्या रोजच्या जीवनातील एक गरज बनले आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या गरजेमुळे कंपन्या देखील नवीन डिझाईनसह स्मार्टफोन लाँच करत आहेत. स्मार्टफोन स्मूद बनवण्यासाठी, कंपन्या वेळोवेळी नवीन सॉफ्टवेअर आणत असतात आणि अनेक कंपन्या जुन्या स्मार्टफोनमध्ये हे सॉफ्टवेअर ओटीए (ओव्हर टू एअर) द्वारे अपडेटही करतात.

हेदेखील वाचा- Google ने लाँच केलं नवीन टूल, आता AI जनरेट इमेज आणि डीपफेक ओळखणं होईल अधिक सोपं

ही कंपनी 7 वर्षांसाठी देते स्मार्टफोन अपडेट

देशात फक्त दोनच स्मार्टफोन कंपन्या आहेत ज्या 7 वर्षांसाठी स्मार्टफोनला सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅच देतात, या कंपन्या गुगल आणि सॅमसंग आहेत. तुम्ही Google Pixel आणि कोणताही Samsung फोन वापरत असल्यास, तुम्हाला 7 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅचची काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे एकदा फोन खरेदी केला की तुम्ही तो 7 वर्षांसाठी वापरू शकता.

ऍपल किती वर्षे सॉफ्टवेअर अपडेट देते?

Apple चे iPhones त्यांच्या सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात आणि बहुतेक वापरकर्त्यांना या कारणास्तव आयफोन खरेदी करण्यास आवडतात. शिवाय iPhone मधील सुरक्षा पॅच खूप मजबूत आहे. आयफोनच्या वाढत्या क्रेझविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु Apple आपल्या iPhone मध्ये फक्त 6 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट आणि सुरक्षा पॅचची सुविधा प्रदान करते आहे. Apple प्रमाणेच चीनी स्मार्टफोन कंपनी OnePlus देखील आपल्या फोनमध्ये 6 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅचची सुविधा देते.

हेदेखील वाचा- मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार? एअरटेल आणि VI च्या किंमती वाढण्याची शक्यता

ही कंपनी देते सर्वात कमी वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट

सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी पॅचसाठी स्मार्टफोनमध्ये 7 आणि 6 वर्षांचे अपडेट्स पुसेरे असतात. पण एक कंपनी आहे जी फक्त 5 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि सिक्युरिटी पॅच देते, ही कंपनी मोटोरोला आहे. जर आपण मार्केट कॅम्पवर नजर टाकली तर मोटोरोलाचे फोन भारतात खूप कमी विकले जातात.

स्मार्टफोनच्या सॉफ्टवेअर अपडेटचे फायदे

स्मार्टफोनची सिक्युरिटी वाढते

सध्या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोणाचाही फोन सहज हॅक झाला जाऊ शकतो. अशा काळात Cyber Security महत्त्वाची ठरते. त्यामुळे युजर्सच्या डाटाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने कंपन्या सॉफ्टवेअर अपडेट्सकडे लक्ष देत आहेत.

फोन ऑपरेटींमध्ये बदल

स्मार्टफोन कंपन्यांनी आणलेल्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे आपला स्मार्टफोन ऑपरेट करणं अधिक सोपं होतं.

फोनचा स्पीड वाढतो

स्मार्टफोन कंपन्यांनी आणलेल्या अपडेटमुळे फोनचा स्पीड वाढतो. जर तुम्ही अपडेट केले तर तुमचा फोन आणि त्यातील अ‍ॅप्सचा वेग वाढेल.

सॉफ्टवेअर अपडेट न करण्याचे तोटे

जर तुम्ही सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट केले नाही तर तुमचा डेटा लिक होऊ शकतो किंवा तुमचा फोन हॅक होऊ शकतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये हॅकर्स सहज प्रवेश करु शकतात.

Web Title: Which company give most software update for smartphone know top 5 phone brand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 11:00 PM

Topics:  

  • smartphone update
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च
1

Samsung India चा मोठा धमाका! 2026 Bespoke AI Appliances ची नवी श्रेणी लॉन्च

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग
2

iPhone 18 Pro साठी मुंबईकरांची क्रेझ! Apple Store बाहेर रात्रीपासूनच चाहत्यांची रांग

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार
3

22 तारखेपर्यंत थांबा! OnePlus चा सर्वात स्वस्त फोन येतोय, 7,000mAh बॅटरीसह फीचर्सही दमदार

Online Shopping Safety Tips:  एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी
4

Online Shopping Safety Tips: एका चुकीच्या क्लिकने खाते होऊ शकते रिकामे; ऑनलाईन खरेदीपूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 3 गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.