Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्याला पाणीच का म्हणतात? एखाद्या वस्तूला तेच नाव का आहे? या विचित्र प्रश्नामागं दडलंय डोकं चक्रावून टाकणारं वैज्ञानिक विश्लेषण!

पाण्याला पाणीच का म्हणतात? एखाद्या वस्तूचं नाव बदललं, तर तिचं वास्तवही बदलतं का? भाषेतील Linguistic Arbitrariness ही संकल्पना शब्द आणि अर्थ यांच्यातील रंजक संबंध उलगडते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 18, 2026 | 09:29 AM
पाण्याला पाणीच का म्हणतात? एखाद्या वस्तूला तेच नाव का आहे? या विचित्र प्रश्नामागं दडलंय डोकं चक्रावून टाकणारं वैज्ञानिक विश्लेषण!
Follow Us
Follow Us:
  • पाणी या शब्दाचा उगम भाषिक परंपरेतून झाला आहे.
  • Linguistic Arbitrariness मुळे शब्द आणि अर्थ यांचा संबंध ठरलेला नसतो.
  • भाषेतील शब्द सामाजिक वापरातून काळानुसार विकसित होत गेले.

आपण रोज असंख्य शब्द वापरतो. पाणी, झाड, आकाश, माणूस, पृथ्वी अशा अनेक शब्दांमधून आपल्या भावना, विचार आणि अनुभव इतरांपर्यंत बोलून,लिहून,वाचून पोहोचवतो. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का, की पाण्याला ‘पाणी’ हेच नाव का दिलं गेलं? पाण्याला आपण झाड का म्हणत नाही. त्याला दुसरं काही नाव असतं, तरी त्याचे गुणधर्म बदलले असते का? या साध्या वाटणाऱ्या प्रश्नामागे भाषाविज्ञान, तत्त्वज्ञान आणि विज्ञान यांच्याशी संबंधित काही रंजक संकल्पना दडलेल्या आहेत. त्यांपैकी 2 महत्त्वाच्या संकल्पना म्हणजे Linguistic Arbitrariness (भाषिक स्वेच्छाधारितता) आणि Contingency (आपातिकता) या आज आपण समजून घेऊयात.

पाण्याला पाणीच का म्हणतात? भाषेतील रंजक गोष्ट

भाषाविज्ञानात Linguistic Arbitrariness ही संकल्पना सांगते की एखाद्या शब्दाचा आणि त्याने दर्शवलेल्या वस्तूचा संबंध बहुतांश वेळा नैसर्गिक किंवा अपरिहार्य नसतो. उदाहरणार्थ, आपण पाण्याला मराठीत ‘पाणी’, इंग्रजीत ‘Water’, हिंदीत ‘पानी’ म्हणतो. वस्तू तीच असते, पण तिच्यासाठी वापरले जाणारे शब्द वेगवेगळे असतात. त्या शब्दाचा तसा काही Universal अर्थ असेलच असे नाही.

याचा अर्थ असाही नाही की कोणीही कोणत्याही वस्तूला कोणतेही नाव देऊन ते लगेच सर्वमान्य करू शकतो. एखादा शब्द समाजात स्वीकारला जातो, लोक तो वापरू लागतात आणि पिढ्यान्‌पिढ्या तो भाषेचा भाग बनतो. भाषेतील शब्द आणि त्यांचे अर्थ हे सामाजिक संकेत, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक बदल यांच्या माध्यमातून विकसित होतात. काही शब्दांचे आवाज त्यांच्या अर्थाशी संबंधित वाटू शकतात, उदाहरणार्थ, ‘काव-काव’ किंवा ‘टणटण’; पण भाषेतील बहुतांश शब्दांसाठी असा नैसर्गिक संबंध आवश्यक नसतो.

माशासारखी शेपटी अन् एलियनसारखे डोकं… इंग्लंडमध्ये आढळून आला रहस्यमयी मासा, रूप पाहून कुणालाही बसेल धक्का

शब्दांना अर्थ कोणी दिला? माणसाने निर्माण केलेल्या भाषेचं रहस्य

शब्दांना अर्थ देण्यासाठी एखादी एकच व्यक्ती किंवा संस्था सुरुवातीपासून जबाबदार होती, असे म्हणता येत नाही. मानवी भाषेचा विकास मोठ्या दीर्घ काळात झाला. सुरुवातीच्या मानवी समूहांनी आवाज, हावभाव आणि इतर संकेतांद्वारे संवाद साधला असावा. कालांतराने काही ध्वनी विशिष्ट वस्तू, कृती किंवा अनुभवांशी जोडले गेले असावेत. हे नेमके कसे घडले, याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे.

आजही शब्दांचे अर्थ पूर्णपणे स्थिर नसतात. उदाहरणार्थ, एखाद्या शब्दाचा अर्थ काळानुसार बदलू शकतो किंवा वेगवेगळ्या प्रदेशांत त्याचे वेगवेगळे अर्थ प्रचलित असू शकतात. शब्दकोश अर्थ नोंदवतात आणि प्रमाणभाषेचे नियम ठरवण्यास मदत करतात; पण ते प्रत्येक शब्दाचा अर्थ शून्यातून निर्माण करत नाहीत. प्रत्यक्षात भाषा ही माणसांनी एकत्र वापरून विकसित केलेली सामूहिक व्यवस्था आहे.

Linguistic Arbitrariness आणि Contingency यांचा परस्पर संबंध

या दोन्ही संकल्पना एकसारख्या नाहीत, पण त्यांच्यात एक महत्त्वाचा समान धागा आहे. Linguistic Arbitrariness आपल्याला सांगते की एखाद्या वस्तूचं नाव हे त्या वस्तूचं आणि त्याच्या नैसर्गिक गुणधर्माच,आकारमानाच किंवा रूपाच काही समीकरण असेल जरुरी नाही. तर Contingency ही तत्त्वज्ञानातील संकल्पना सांगते की एखादी गोष्ट जशी आहे, तशीच असणं अनिवार्य असेलच असं नाही; काही परिस्थितींमध्ये ती वेगळीही असू शकली असती.

उदाहरणार्थ, पाण्याला ‘पाणी’ ऐवजी दुसरा शब्द वापरला असता, तरी त्याची रासायनिक रचना बदलली नसती. हे भाषिक स्वेच्छाधारिततेचं उदाहरण आहे. त्याचप्रमाणे, भाषेचा इतिहास वेगळा घडला असता, तर आज आपण वापरत असलेले शब्दही वेगळे असू शकले असते. हा भाषेच्या विकासातील आपातिकतेचा पैलू आहे.

भाषेतील शब्द, विश्वाचं अस्तित्व या दोन विषयांमध्ये एक समान प्रश्न दिसतो: आपण जे वास्तव मानतो, ते नेमकं कसं समजून घेतो? शब्द जगाला नावं देतात, विज्ञान त्यातील नियम शोधतं आणि तत्त्वज्ञान त्या नियमांच्या अर्थाबद्दल प्रश्न विचारतं. या दोन्हींच्या मदतीने आपण आपल्या भोवतालच्या जगाकडे अधिक जिज्ञासेने पाहू शकतो. आहे कि नाही इंटरेस्टिंग?

ओटी भरणे, आहेर करणे, दुखवटा देणे, गारवा आणणे, परडी सोडणे, वाण देणे या रीतीरिवाजांच्या कोणकोणत्या परंपरा आणि नियम आहेत? जाणून घ्या

💡 Frequently Asked Questions

1. Linguistic Arbitrariness म्हणजे काय?

भाषेतील शब्द आणि त्यांनी दर्शवलेल्या वस्तू यांच्यात नैसर्गिक किंवा अपरिहार्य संबंध असतोच असं नाही, या संकल्पनेला Linguistic Arbitrariness म्हणतात.

2. Linguistic Arbitrariness आणि Contingency यांत काय फरक आहे?

Linguistic Arbitrariness ही शब्द आणि अर्थ यांच्यातील संबंधाबद्दलची भाषावैज्ञानिक संकल्पना आहे. Contingency म्हणजे एखादी गोष्ट वेगळी असू शकली असती, ती अपरिहार्यपणे अशीच असावी असं नाही, ही तत्त्वज्ञानातील संकल्पना आहे.

3. शब्दांना अर्थ कोणी दिला आणि भाषेचा जन्म कसा झाला?
शब्दांना अर्थ देणारी एखादी एकच व्यक्ती नव्हती. मानवी भाषेचा विकास दीर्घ काळात सामाजिक संवाद, आवाज, हावभाव आणि सामूहिक वापरातून झाला असावा. आजही लोकांच्या वापरानुसार शब्दांचे अर्थ बदलत राहतात आणि भाषा सतत विकसित होत असते.

Web Title: Why water is called water linguistic arbitrariness contingency ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 09:29 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.