आपल्या या जगात अनेक अशा अलौकिक गोष्टी आहेत ज्या अजूनपर्यंत मानवापर्यंत पोहचल्या नाहीत. मात्र या गोष्टी जेव्हा अचानक समोर येतात किंवा त्यांचा शोध लागतो तेव्हा त्या सर्वांनाच थक्क करून सोडतात. आताही असेच काही घडून आले आहे. इंग्लंडच्या समुद्रकिनाऱ्यावर एक विचित्र मासा सापडल्याची घटना घडली आहे. याचे रूप इतके भयानक आहे की ते पाहून आता अनेकांना तो एलियन असल्याचा भास होत आहे.
माशासारखी शेपटी अन् एलियनसारखे डोकं... इंग्लंडमध्ये आढळून आला रहस्यमयी मासा, रूप पाहून कुणालाही बसेल धक्का
इंग्लंडच्या केंटच्या मार्गेट येथील समुद्रकिनाऱ्यावर हा विनीता मासा सापडला आहे. या माशाचे डोके एलियनसारखे दिसत आहे, तर याची शेपटी माशासारखी आहे. लोक याला मरमेडचा सांगाडाही म्हणत आहेत
पॉला आणि डेव्ह रेगन यांनी हा रहस्यमय प्राणी पाहिला आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांना वाटले की ते समुद्रात तरंगणारे लाकूड आहे किंवा मृत सील आहे
चित्रांमध्ये, माशाचे डोके सांगाड्यासारखे होते, परंतु त्याची शेपटी माशासारखी मऊ आणि चिकट होती, ज्यामुळे ते आणखी रहस्यमयी वाटू लागते
डेव्ह रेगन यांनी सांगितले की, या रहस्यमय दिसणाऱ्या माशाभोवती लोकांचा जमाव जमला होता. काही लोकांनी याला जलपरीचा अंश मानले, परंतु हे पूर्णपणे स्पष्ट नव्हते
दरम्यान माशाचा हा विचित्र प्रकार मात्र आता इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. लोक त्यातील दृश्य पाहून हादरले आहेत