Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

X Money Service: पैशांचा ऑनलाइन व्यवहार होणार अधिक सोपा! आता सोशल मीडियावरही करता येणार ट्रान्सेक्शन

Elon Musk's X Money: ऑनलाईन व्यवहार करायचा असतो तेव्हा आपल्याला गुगल पे सारखे ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप किंवा बँकिंग अ‍ॅपची गरज असते. पण आता एलन मस्क एक असं फीचर घेऊन येणार आहे, ज्यामुळे एक्सवर पेमेंट करता येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 28, 2025 | 11:37 AM
X Money Service: पैशांचा ऑनलाइन व्यवहार होणार अधिक सोपा! आता सोशल मीडियावरही करता येणार ट्रान्सेक्शन

X Money Service: पैशांचा ऑनलाइन व्यवहार होणार अधिक सोपा! आता सोशल मीडियावरही करता येणार ट्रान्सेक्शन

Follow Us
Follow Us:

एलन मस्कचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. एक्सवर शेअर केलेली माहिती सहसा अधिकृत मानली जाते. शिवाय राजकारणी आणि नेतेमंडळी देखील X वर सतत काही ना काही पोस्ट करत असतात. त्यामुळे X चे युजर्स दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या आधीपासूनच लोकप्रिय असलेल्या X ला आता अधिक पावरफुल बनवलं जाणार आहे, यासाठी X चा मालक एलन मस्क प्रयत्न करत आहे.

अरे देवा! Google Photos चं स्टोरेज झालं फुल्ल? एक्सपर्टच्या या Smart Tricks करणार तुमची मदत

एलन मस्कला X ला एव्हरिथिंग अ‍ॅप बनवायचं आहे, म्हणजेच अगदी फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यापासून पेमेंट करण्यापर्यंत लोकं X वर सर्व काही करू शकणार आहेत. यासाठीच मस्क प्रयत्न देखील करत आहे. एलन मस्क लवकरच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर डिजिटल पेमेंट सर्विस X Money सुरु करणार आहे. Tesla चे सीईओ Elon Musk गेल्या अनेक महिन्यांपासून पेमेंट सर्विस X Money बाबत पोस्ट करत आहेत. मात्र ही सेवा कधी सुरु केली जाणार, त्याची लाँच डेट काय असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

मात्र पेमेंट सर्विस X Money बाबत एलन मस्कचं असं म्हणणं आहे की, त्यांचं नेटवर्क इंफ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार आहे. ते लवकरच बीटा टेस्टिंग सुरु करणार आहेत. X वर पेमेंट सर्विस सुरु करण्यासाठी मस्कने स्पेशल प्रोजेक्ट देखील सुरु केला आहे. ही पेमेंट सर्विस त्या स्पेशल प्रोजेक्टचा एक भाग आहे. लवकरच आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स एव्हरिथिंग अ‍ॅप म्हणून ओळखलं जाणार आहे. जिथे युजर्सना सर्व सुविधा मिळणार आहेत.

X Money बीटा टेस्टिंग लवकरच सुरु होणार

X वर @teslaownerssv यूजर आईडीने एक पोस्ट शेअर करत दावा केला आहे की, X Money सर्विस लवकरच सुरु केली जाणार आहे, पेमेंट आणि बँकिंग सर्विससह एलन मस्क X ला एव्हरिथिंग अ‍ॅप बनवणार आहे. X वर पोस्ट शेयर करत मस्कने सांगितलं आहे की, लिमिटेड अ‍ॅक्सेससब के लवकरच बीटा टेस्टिंग सुरु होणार आहे.

Jio घेऊन आलाय धमाकेदार ऑफर! 343 रुपयांच्या मंथली खर्चात मिळणार ओटीटी आणि अनलिमिटेड 5G ची मजा!

समोर आलेल्या काही अहवालांवर विश्वास ठेवला तर X Money प्लॅटफॉर्म क्रिप्टो ट्रांसजेक्शनला सपोर्ट करणार आहे. यासोबतच हे बिटकॉइनसह देखील लिंक केलं जाणार आहे. Musk एक्सवर पेमेंट सर्विस सुरु करण्यासाठी Visa सह काम करत आहेत.

X Money: काय असणार खास?

एलन मस्कने ऑक्टोबर 2022 मध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर खरेदी केलं आणि त्याचं नाव एक्स ठेवलं. तेव्हापासून तो X वर पेमेंट सेवा सुरू करण्यावर काम करत आहेत. यासाठी त्यानी अमेरिकेतील 41 राज्यांमध्ये आवश्यक परवाने देखील मिळवले आहेत. ट्विटर खरेदी केल्यापासून, तो सतत त्यात नवीन वैशिष्ट्ये आणि बदल जोडत आहे.

Web Title: X money service will start soon know how users can use it tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • elon musk
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.