राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले... जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Free Fire Max: एक चूक आणि गेम संपला! ‘या’ कारणांमुळे बॅन होऊ शकतं तुमचं गेमिंग अकाऊंट, सावध व्हा
Honor Win च्या 12GB + 256GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 51,000 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,499 म्हणजेच सुमारे 57,000 रुपये, 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,799 म्हणजेच सुमारे 61,000 रुपये आणि 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 67,000 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
Honor Win RT च्या 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 33,000 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,099 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 36,000 रुपये, 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,399 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 51,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्मार्टफोन्स ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट कलर ऑप्शमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
You can make fun of its design, but this new Honor phone has crazy good specs. Honor Win comes with:
– Qualcomm’s best chip (Snapdragon 8 Elite Gen 5
– Honor turbine cooling system with a 25,000 RPM fan (5.7°C temperature drop)
– 10,000 mAh Silicon-Carbon battery
– 100W charging… pic.twitter.com/NE6THsv7fP — Alvin (@sondesix) December 26, 2025
डुअल सिम (नॅनो+नॅनो) Honor Win अँड्राईड 16 वर बेस्ड MagicOS 10 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंचाचा फुल-HD+ (1,272×2,800 पिक्सेल) OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 185Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 6,000 निट्स पीक ब्राइटनेस आणि 94.60 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आहे. डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 चिपसेटने सुसज्ज आहे. यासोबतच यामध्ये 16GB पर्यंत रॅम आणि जास्तीत जास्त 1TB ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर Honor Win मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा 1/1.56-इंच सेंसर, 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा आणि ऑटोफोकससह 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल मॅक्रो कॅमेरा समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे. Honor Win मध्ये 5G, ब्लूटूथ 6.0, जीपीएस, एनएफसी, ओटीजी आणि एक यूएसबी टाइप-C पोर्ट असे कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. यामध्ये एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, ग्रेविटी सेंसर, फ्लिकर सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर सारखे सेंसर आहेत. यामध्ये डुअल स्पीकर आणि डुअल माइक्रोफोन आहे. हे AI फेस-स्वॅपिंग डिटेक्शन, ब्लर लोकेशन आणि पॅरेलल स्पेस सारख्या अनेक AI फीचर्सना सपोर्ट करतो.
Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक
Honor Win मध्ये 10,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 100W (वायर्ड) आणि 80W (वायरलेस) फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन 27W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. कंपनीने दावा केला आहे की, बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 16.4 तासांचा गेमिंग टाइम आणि 31.3 तासांपर्यंत व्हिडीओ स्ट्रीमिंग टाइम ऑफर करते. कंपनीने दावा केला आहे की, यामध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षण देण्यासाठी IP68, IP69 आणि IP69K रेटिंग आहे.
Honor Win RT मध्ये Honor Win मॉडेल सारखेच सिम, सॉफ्टवेयर आणि डिस्प्ले फीचर्स आहेत. Honor Win RT स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटवर अॅड्रेनो 830 जीपीयू, 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह उपलब्ध आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा 1/1.56-इंच सेंसर आणि 12-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल मॅक्रो कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. Honor Win RT मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन आणि सेंसर Honor Win मॉडेल सारखेच आहेत. यामध्ये 100W (वायर्ड) फास्ट चार्जिंगसह 10,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Ans: Honor पूर्वी Huawei चा सब-ब्रँड होता.
Ans: होय, Honor आता पूर्णपणे स्वतंत्र ब्रँड आहे.
Ans: Android-आधारित MagicOS वापरला जातो.






