Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा

Xiaomi Smartwatch Launched: शाओमीने पुन्हा एकदा एक नवीन स्मार्टवॉच लाँच केली आहे. अनोखे हेल्थ फीचर्स, दमदार स्पेसिफेकशन्स आणि मिड रेंज किंमत अशा वैशिष्ट्यांसह नवीन डिव्हाईस लाँच करण्यात आले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 27, 2025 | 10:49 AM
Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा

Xiaomi Watch 5: स्मार्टवॉच मॉनिटर करणार मसल हेल्थ! EMG सेन्सरने बदलणार फिटनेस गेम, Xiaomi च्या नव्या डिव्हाईसची सर्वत्र चर्चा

Follow Us
Close
Follow Us:
  • Xiaomi Watch 5 स्मार्टवॉच चीनमध्ये लाँच
  • नवीन स्मार्टवॉच टेक फर्मच्या लाइनअपमधील लेटेस्ट एडिशन
  • Xiaomi Watch 5 हे स्मार्टवॉच एकाच आकारात लाँच
 

टेक कंपनी Xiaomi ने चीनमध्ये त्यांचे एक नवीन स्मार्टवॉच लाँच केले आहे. हे डिव्हाईस Xiaomi Watch 5 या नावाने लाँच करण्यात आले आहे. कंपनीने फ्लॅगशिप Xiaomi 17 Ultra, Xiaomi 17 Ultra Leica Edition आणि Buds 6 सह चीनमध्ये Xiaomi Watch 5 लाँच केले आहे. कंपनीने लाँच केलेले हे नवीन स्मार्टवॉच टेक फर्मच्या लाइनअपमधील लेटेस्ट एडिशन आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड ऑक्सीजन मॉनिटरिंग आणि ECG ट्रॅकिंग सारखे अनेक हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये एक EMG सेंसर देखील आहे, जे स्मार्टवॉचला यूजरची मसल हेल्थ मॉनिटर करण्याची सुविधा देणार आहे. सध्या हे स्मार्टवॉच कंपनीच्या वेबसाईटवर चार वेगवेगळ्या रंगात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Xiaomi Watch 5 ची किंमत आणि उपलब्धता

Xiaomi Watch 5 हे स्मार्टवॉच एकाच आकारात लाँच करण्यात आले आहे. या डिव्हाईसची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 15,000 रुपये आहे. तसेच Xiaomi Watch 5 च्या eSIM व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 29,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे व्हेरिअंट सध्या शाओमी चायना ऑनलाईन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने स्मार्टवॉच ब्लॅक फ्लोरोएलास्टोमर स्ट्रॅप, खाकी ग्रीन फ्लोरोपॉलीमर स्ट्रॅप, गोल्ड आणि ब्राउन जेनुइन लेदर स्ट्रॅप आणि सॉफ्ट ब्लू जेनुइन लेदर स्ट्रॅप (चीनमधून भाषांतरित) कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. (फोटो सौजन्य – X) 

Xiaomi Watch 5 launches on 25th December alongside the Xiaomi 17 Ultra. – Snapdragon W5 Processor
– Xiaomi’s first EMG sensor
– ECG Heart rate sensor
– Double sided artificial Sapphire glass
– Stainless steel unibody case https://t.co/zUVKdPjUzl pic.twitter.com/ntHwazp6Om
— Mukul Sharma (@stufflistings) December 22, 2025

Xiaomi Watch 5 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Xiaomi Watch 5 मध्ये 1.54-इंच अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 312 ppi पिक्सेल डेंसिटी, 480×480 पिक्सेल रेजोल्यूशन आणि 1,500 निट्सपर्यंत पीक ब्राईटनेस देण्यात आली आहे. यामध्ये एक सर्कुलर डायल आहे, ज्यामध्ये बाजूला एक रोटरी क्राउन आणि एक नेविगेशन बटन आहे. हेल्थ ट्रैकिंग फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ब्लड-ऑक्सीजन लेवल मॉनिटरिंग आणि ECG ट्रॅकिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

हे फीचर इनेबल करण्यासाठी Xiaomi च्या Watch 5 मध्ये एक हार्ट रेट सेंसर, एक SpO2 सेंसर, एक ECG सेंसर आणि एक EMG सेंसर आहे. कंपनीने दावा केला आहे की, EMG सेंसरसह उपलब्ध असलेली ही पहिली स्मार्टवॉच आहे, जी यूजर्सच्या मसल हेल्थ मॉनिटर करण्यासाठी मदत करते. ऑनबोर्ड सेंसरच्या लिस्टमध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक जायरोस्कोप, एक जियोमॅग्नेटिक सेंसर, एक बॅरोमेट्रिक प्रेशर सेंसर आणि एक एम्बिएंट लाइट सेंसर देखील समाविष्ट आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनीचा मोठा निर्णय! ‘ही’ सर्व्हिस लवकरच बंद होण्याची शक्यता, लाखो ग्राहकांवर होणार परिणाम

कनेक्टिविटी ऑप्शन्सबद्दल बोलायचं झालं तर, Xiaomi Watch 5 या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये वायफाय, eSIM, ब्लूटूथ 5.4, एनएफसी, बेईडो, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ आणि OZSS देण्यात आले आहे. Xiaomi Watch 5 हे अँड्रॉईड 8 किंवा त्यापुढील आणि iOS 14 आणि त्यापुढील वर्जनवर चालणाऱ्या डिव्हाईससोबत सुसंगत आहे. यात 930mAh लिथियम-आयन बॅटरी देखील आहे. हे स्मार्टवॉच 47x47x12.3mm मोजते आणि त्याचे वजन अंदाजे 56 ग्रॅम आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Xiaomi ची स्थापना कधी झाली?

    Ans: 2010 साली Lei Jun यांनी Xiaomi ची स्थापना केली.

  • Que: Xiaomi भारतात कधी आले?

    Ans: 2014 मध्ये Xiaomi ने भारतात प्रवेश केला.

  • Que: Xiaomi फोनमध्ये कोणता OS असतो?

    Ans: Android-आधारित HyperOS (पूर्वी MIUI).

Web Title: Xiaomi watch 5 launched smartwatch is equipped with different health features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • smartwatch
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

राक्षसी बॅटरीसह लाँच झाले हे स्मार्टफोन्स! 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6.83-इंच डिस्प्ले… जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! मोठी बॅटरी, 200MP Leica कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसर… Xiaomi 17 Ultra पाहताच यूजर्स झाले फिदा
2

स्मार्टफोन कंपन्यांची उडाली झोप! मोठी बॅटरी, 200MP Leica कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसर… Xiaomi 17 Ultra पाहताच यूजर्स झाले फिदा

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

11 इंच मोठी स्क्रीन आणि 7000mAh बॅटरी… itel ने भारतात लाँच केला नवा टॅब्लेट! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.