
Year Ender 2025: या वर्षी PS5 वर धुमाकूळ घालणारे हे आहेत टॉप गेम्स, जाणून घ्या सविस्तर
Clair Obscur: Expedition 33 हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहिलेला आणि अवार्ड-विनिंग टाइटल असा गेम होता. हा गेम तुम्हाला Lumiere आइलँडच्या रहस्यमय आणि अंधारातील जगात घेऊन जातो. जिथे द पेंट्रेस नावाची एक धोकादायक संस्था दरवर्षी ‘द गोमेज’ नावाचा नरसंहार करते. या वर्षी वाचलेल्यांची संख्या केवळ 33 होती. प्रमुख कॅरेक्टर Gustave आणि त्याची बहिण Maelle एका धोकादायक प्रवासाला जातात. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही UCL, Premier League किंवा Laliga ला फॉलो करत असाल, तर EA FC 26 तुमच्यासाठी एक ड्रिम पॅकेज असू शकतं. या गेममध्ये तुम्हाच्यासाठी आवडते क्लब्स, स्टार प्लेयर्स आणि प्रतिष्ठित टूर्नामेंट्स अतिशय रियलिस्टिक पद्धतीने समाविष्ट करण्यात आले आहेत. Ultimate Team मोड यावेळी अजून शक्तिशाली झाला आहे. इथे तुम्ही तुमची ड्रीम टिम जगातील कोणत्याही क्लब, लीग किंवा खेळाडूसोबत बनवूशकता. फूटबॉल फॅन्ससाठी तर हा गेम एक बेस्ट निवड असणार आहे.
Ghost of Tsushima चाहत्यांसाठी हा गेम धमाकेदार ठरणाार आहे. ‘घोस्ट ऑफ योतेई’ची कथा अत्सु नावाच्या एका योद्ध्याभोवती फिरते, जो तिच्या कुटुंबाचा बदला घेण्यासाठी योतेई सिक्स नावाच्या क्रूर गटाचा सामना करतो. अधिक चांगली शस्त्रे मॅकेनिक्स, डार्क टोन आणि जबरदस्त ओपन-वर्ल्ड डिझाईनमुळे हा गेम PS5 च्या टॉप अॅक्शन टाइटल्सपैकी एक ठरला आहे.
1964 च्या Cold War सेटअपची आठवण करून देणारा हा Solid Remake गेम 2025 मध्ये लोकांना प्रचंड आवडला. Naked Snake चे मिशन-एक साइंटिस्टला वाचवणं आणि न्यूक्लियर वेपन प्रोजेक्टला थांबवण, अतिशय मजेदार ठरलं. स्टेल्थ बेस्ड कॉम्बॅट, सिनेमॅटिक एक्सपीरियंस आणि PS5 च्या शक्तिशाली ग्राफिक्स कॅपेबिलिटीमुळे हा गेम लोकप्रिय ठरला.
Death Stranding 2 मध्ये Sam Porter Bridges यावेळी Drawbridge नावाच्या एका नवीन संस्थेसोबत काम करत होता आणि ऑस्ट्रेलियन कंटिनेंटमध्ये एका मोठ्या आणि धोकादायक प्रावासाला जातो. हा गेम सर्वाइवल, कथाकथन आणि इमोशनल डेप्थचे एक शक्तिशाली मिश्रण आहे, ज्यामध्ये उच्च-ताणाचे क्षण आणि सिनेमॅटिक दृश्ये ही त्याची वैशिष्ट्ये आहेत.