YouTube ने हे प्रसिद्ध भारतीय चॅनल केलं बॅन, AI-जनरेटेड मूवी ट्रेलर आणि असे होते व्हिडीओ; जाणून घ्या सविस्तर
युट्यूबने स्क्रीन कल्चर आणि KH स्टूडियो आशा दोन्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता युट्यूबवर सर्च केल्यानंतर देखील यूजर्सना हे चॅनेल्स दिसणार नाहीत. याशिवाय, चॅनेल्सचा यूआरएल आता एका रिकाम्या पेजवर रीडायरेक्ट होतो, जिथे लिहीले जाते की, हे पेज आता उपलब्ध नाही. यासाठी माफी असावी. (This page isn’t available. Sorry about that.)’ (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्सनुसार, दोन्ही चॅनेल्सचे मिळून दोन मिलियनहून अधिक सब्सक्राइबर्स होते आणि एक बिलियनहून अधिक व्ह्युज होते. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही चॅनेल्सनी व्ह्युज वाढवण्यासाठी नकली मूवी ट्रेलरचा वापर केला. नकली मूवी ट्रेलर बनवण्यासाठी AI-जेनरेटेड इमेजसह ऑफिशियल फुटेज पोस्ट केले होते. असं सांगितलं जात आहे की, युट्यूबने या वर्षाच्या सुरुवातीला या चॅनेलवरील जाहिराती बॅन केल्या होत्या. हा निर्णय पॉलिसी उल्लंघण केल्याप्रकरणी घेण्यात आला होता.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युट्यूबने दिशाभूल करणाऱ्या आणि फसव्या कंटेटसंबंधित अतिशय कठोर कंटेंट पॉलिसी अपडेट करत असते. यूट्यूबच्या पॉलिसीनुसार, प्लॅटफॉर्मवर जर कोणत्याही चॅनेलद्वारे व्ह्युज वाढवण्यासाठी आणि जाहिराती मिळवण्यासाठी मिसलीडिंग कंटेट अपलोड केला जातो, अशावेळी संबंधित चॅनेलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जातो. याशिवाय खोटे थंबनेल, टाइटल आणि फूटेज अपलोड करणं देखील युट्यूबच्या पॉलिसीचे उल्लंघण मानले जाते.
कंपनीचे प्रवक्ता जॅक मालोन ने एका वृत्तसंस्थेला सांगितलं आहे की, सुरुवातीलाच या चॅनेलला महत्त्वाचे बदल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र तरी देखील मॉनिटाइजिंग झाल्यानंतर स्पॅम कंटेट अपलोड करून पुन्हा एकदा प्लॅटफॉर्मच्या पॉलिसीचे उल्लंघन करण्यात आले. हे मिसलीडिंग मेटाडेटा पॉलिसीचे उल्लंघन आहे, ज्यामुळे हे चॅनेल्स बॅन करण्यात आले आहेत. स्क्रीन कल्चरचे फाउंडर निखिल पी. चौधरीने एका वृत्तसंस्थेला सांगितलं आहे की, हे AI-जेनरेटेड नकली व्हिडीओ तयार करण्यासाठी 10 हून अधिक एडिटर्सना नियुक्त केले होते. YouTube च्या अल्गोरिथमला फसवण्याच्या त्याच्या रणनीतीमध्ये हे ट्रेलर लवकर पोस्ट करणे आणि व्हिडिओंमध्ये वारंवार बदल करणे समाविष्ट असल्याचे सांगितले जाते.
Ans: YouTube चे Community Guidelines किंवा Copyright नियम वारंवार मोडल्यास चॅनल बॅन केलं जातं.
Ans: नाही, पण AI-Generated कंटेंट चुकीच्या पद्धतीने, दिशाभूल करणारा किंवा कॉपीराइट तोडणारा असेल तर कारवाई होते.
Ans: खरे वाटणारे बनावट ट्रेलर प्रेक्षकांची फसवणूक करतात आणि कॉपीराइट उल्लंघन होऊ शकतं.






