AI फीचर्सवाला बजेट फ्रेंडली iPhone स्वस्तात खरेदी करण्याची संधी! या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर मिळतेय जबरदस्त डिल
टेकजायंट कंपनी Apple ने अलीकडेच त्यांचा स्वस्त आयफोन iPhone 16e लाँच केला आहे. ज्यांना आयफोन खरेदी करायचा पण बजेट कमी आहे, अशा लोकांसाठी हा स्वस्त आयफोन लाँच करण्यात आला आहे. iPhone 16e अनेक Apple Intelligence फीचर्सने सुसज्ज आहेत. असा हा बजेट आयफोन खरेदी करण्याचा विचार करताय का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Apple Intelligence फीचर्सने सुसज्ज असलेला हा बजेट मॉडेल iPhone 16e तुम्हाला आता आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Apple चा iPhone 16e बजेट फ्रेंडली आहे. या फोनमध्ये अनेक Apple Intelligence फीचर्स देण्यात आले आहेत. हा बजेट फ्रेंडली ग्राहकांसाठी एक परफेक्ट मॉडेल आहे. अनेक जबरदस्त फीचर्सनी सुसज्ज असलेल्या या आयफोनची खरेदी करण्याचा विचार करताय का? तुम्ही मोठ्या डिस्काऊंटसह Amazon वरून iPhone 16e ची खरेदी करू शकता. या वर्षी लाँच करण्यात आलेला हा फोन सिंगल कॅमेरा, Apple Intelligence सपोर्ट, नॉच डिस्प्ले आणि कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो. जर तुम्हाला हे फीचर्स हवे असतील, तर Amazon वर iPhone 16e वर उपलब्ध असलेल्या डीलबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone 16e तुम्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. हा फोन Amazon वर 53,600 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे, ज्यामध्ये 6,300 रुपयांचं डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. याशिवाय, HDFC सह निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 1,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते, ज्यामुळे किंमत सुमारे 52,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार EMI किंवा नो-कॉस्ट EMI पर्याय देखील निवडू शकता.
जर तुम्हाला किंमत आणखी कमी करायची असेल तर तुम्ही Amazon च्या एक्सचेंज प्रोग्रामचा वापर करू शकता. तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल, स्थिती आणि ब्रँडनुसार तुम्हाला 33,350 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्यामुळे फोनची किंमत आणखी कमी होते. लक्षात ठेवा, ही किंमत 128GB व्हेरिअंटसाठी आहे आणि फोन काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
iPhone 16e मध्ये 6.1 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे आहे, जो 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा A18 चिपसेटने सुसज्ज आहे आणि त्यात अॅल्युमिनियम फ्रेम, फेस आयडी आणि IP68 सर्टिफिकेशन आहे. फोनमध्ये 8GB रॅम आहे आणि तो इमेज प्लेग्राउंड, जेनमोजी, चॅटजीपीटी इंटिग्रेशन, रायटिंग असिस्टंट टूल्स आणि इतर अनेक फीचर्ससह अॅपल इंटेलिजेंस फीचर्सना सपोर्ट करतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 16e मध्ये 2x ऑप्टिकल झूमसह 48MP मुख्य कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये अॅक्शन बटण देखील देण्यात आले आहे आणि तो नवीनतम iOS 18 वर चालतो. येत्या काही आठवड्यात त्याला iOS 26 अपडेट देखील मिळेल.