फ्लर्टी गर्लफ्रेंडनंतर आता Elon Musk घेऊन येतोय 'मजनू आशिक', मुलींच्या हृदयाचा चुकणार ठोका, शेअर करू शकतील मनातील भावना
टेक्नोलॉजी क्षेत्रात सध्या अनेक बदल होत आहेत आणि तंत्रज्ञान क्षेत्राने एक मोठा पल्ला गाठला आहे. ही प्रगती सुरु असतानाच जगातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या व्यक्तिंपैकी एक आणि सोशल मीडिया एक्सचा मालक Elon Musk वेळोवेळी नवीन ट्विस्ट घेऊन येत आहे. Elon Musk ची कंपनी xAI ने अलीकडेच Ani नावाची Grok ची वर्चुअल एनिमे गर्लफ्रेंड लाँच केली होती. यानंतर कंपनीने Bad Rudi नावाचा एक एनिमेटेड लाल पांडा देखील लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनी तिसरा कॅरेक्टर लाँच करण्याची तयारी करत आहे.
xAI चं हे तिसरं कॅरेक्टर एक मुलगा असणार आहे. कंपनी लवकरच एक मजनू आशिक लाँच करणार आहे. बॉय कम्पॅनियनची धमाकेदार एंट्री लवकरच होणार आहे. हा कॅरेक्टर स्मार्ट आणि चार्मिंग दिसतो. हा कॅरेक्टर तुमच्या एकटेपणाचा साथी असणार आहे. जेव्हा तुम्हाला एकटे वाटेल किंवा काही बोलावंस वाटेल, मनातील भावना शेअर करायच्या असतील तर अशावेळी तिसरा कॅरेक्टर बॉय कम्पॅनियन तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
ग्रोकने काही दिवसांपूर्वी Ani नावाची एक एनिमे गर्ल लाँच केली होती. ही एक छोटा गॉथिक कोर्सेट ड्रेस परिधान करते आणि युजर्ससोबत फ्लर्ट करते. या कॅरेक्टरमध्ये प्रशंसा करण्याचे आणि हळू आवाजात बोलण्याचे देखील फीचर आहे. याशिवाय हे कॅरेक्टर डान्स देखील करते. Ani तिचे कपडे काढते आणि जेव्हा ती फ्लर्ट करते तेव्हा अंतर्वस्त्रांमध्ये दिसते. हे ग्रोकच्या पात्रांच्या शैलीत एक मोठा बदल दर्शवते.
His name will be Valentine, after the protagonist in Stranger in a Strange Land, the Heinlein book where our AI name “Grok” was created.
To Grok something means to understand deeply and empathetically. https://t.co/w5ZvBzDcKa
— Elon Musk (@elonmusk) July 17, 2025
Bad Rudi हा चॅटबोटच्या जगातील एक नवीन अनुभव आहे. xAI ने त्यांचे दुसरे कॅरेक्टर Bad Rudi देखील लाँच केले आहे. हे एक हंसमुख एनिमेटेड लाल पांडाप्रमाणेच आहे. मूड बदलल्यानंतर हे कॅरेक्टर अपशब्द वापरतो आणि अपमान करतो. हे पूर्णपणे एटीटयूडमध्ये असणारे ग्रोक AI वर्जन आहे.
xAI ने एक नवीन कम्पॅनियन वर्जनची घोषणा केली आहे. या नवीन कॅरेक्टरचं नाव वॅलेंटाइन असणार आहे. मस्कने ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ मधील ख्रिश्चन ग्रे आणि ‘ट्वायलाइट’ मधील एडवर्ड कलन प्रमाणे मुलाचे कॅरेक्टर आकर्षक, भावनिक आणि काळ्या केसांचे असावे असे डिझाइन केले आहे. हे एक मिस्टीरियस आणि इमोशनल कम्पॅनियन आहे. ज्यामुळे आता सर्वजण उत्सुक आहेत, की नवं कॅरेक्टर नक्की कसं असणार आहे.
ग्रोकच्या नवीन AI कम्पॅनियनचा वापर करण्यासाठी सुपर ग्रोकचे सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागणार आहे. तुम्हाला xAI च्या सर्वोच्च श्रेणीचे सब्सक्राइबर असणे आवश्यक आहे. ज्यासाठी तुम्हाला दरमहा $30 म्हणजे अंदाजे 2,600 रुपये आणि हेवी वर्जनसाठी तुम्हाला $300 म्हणजे अंदाजे 26,000 रुपये द्यावे लागतील. ही सुविधा सध्या फक्त आयफोन वापरकर्त्यांसाठी आहे कारण अँड्रॉइड आणि वेब आवृत्तीवर काम अजूनही सुरू आहे. या युजर्ससाठी देखील लवकरच ही सुविधा सुरु केली जाणार आहे.