Flipkart Big Billion Days 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये मिळणार छप्परफाड डिस्काऊंट आणि धमाकेदार ऑफर्स, खरेदीपूर्वी करा हे काम
Flipkart Big Billion Days 2025 सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहे. खरं तर हा सेल सर्वांसाठी 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र प्लस मेंबर्ससाठी हा सेल 24 तास आधीच सुरु होणार आहे. सेलमध्ये तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या घरासाठी अनेक वस्तूंची खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वस्तूंच्या किंमती प्रचंड कमी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला शॉपिंगसह बचत करण्याची देखील संधी मिळणार आहे.
सेलमध्ये ग्राहक विविध वस्तूंच्या खरेदीवर ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकणार आहेत. Flipkart Big Billion Days 2025 सेलमध्ये ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत आणि ब्यूटी प्रोडक्ट्सपासून घरातील वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी कमी किंमतीत खरेदी करायच्या असतील तर हा सेल तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. (फोटो सौजन्य – X)
फ्लिपकार्ट सेल 23 सप्टेंबरपासून सुरु होणार असला तरी देखील प्लस मेमंबर्सना 24 तास आधीच या सेलचा अॅक्सेस दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीच्या ऑफर आणि डिस्काऊंटचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्ट मेंबरशिप खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक अशा दोन प्रकारच्या मेंबरशिप उपलब्ध आहेत. तसेच जर तुम्ही सतत फ्लिपकार्टवरून शॉपिंग करत असाल तर तुमच्याकडे सुपर कॉइन्स असतील.
जर तुम्ही 200 सुपर कॉइन्स गोळा केले असतील तर या सुपर कॉइन्सच्या बदल्यात तुम्हाला प्लस मेंबरशिप मिळू शकते. त्यामुळे मेंबरशिप खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची देखील गरज भासणार आहे. तसेच कंपनीने सुरु केलेल्या नवीन ब्लॅक मेंबरशिप प्रोग्रामद्वारे देखील तुम्ही मेंबर बनू शकता. या प्रोग्राममध्ये तुम्हाला अर्ली एक्सेस, एक्सक्लूसिव डिस्काउंटसह अनेक फायदे मिळणार आहेत.
फ्लिपकार्ट सेलदरम्यान जर तुम्ही एक्सिस आणि आयसीआयसीआय बँक क्रेडीट कार्डचा वापर केला तर तुम्हाला जास्तीचा फायदा होणार आहे. या कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना सर्वात जास्त फायदा मिळणार आहे. जर तुमच्याकडे हे क्रेडिट कार्ड नसतील तर तुम्ही त्यांच्यासाठी अर्ज करू शकता. जर तुमच्याकडे आधीच असतील तर ते सुरक्षित ठेवा. विक्री सुरू होताच तुम्ही ते वापरू शकता.
हा आहे Apple iPhone मधील सर्वात महागडा पार्ट, तब्बल इतकी असते किंमत! वाचून तुमचेही उडतील होश
सेलदरम्यान मोठ्या संख्येने लोकं शॉपिंग करतात. अशावेळी अनेक प्रोडक्ट्स आउट ऑफ स्टॉक होतात. यामुळे तुम्हाला खरेदी करण्याची संधी मिळत नाही. अशा समस्येपासून बचाव करता यावा यासाठी आधीच तुम्ही प्रोड्क्ट्स विशलिस्ट करून ठेवा. याचा फायदा असा होईल की विक्री सुरू झाल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट्स शोधावी लागणार नाहीत आणि तुम्ही अॅप किंवा वेबसाइट उघडताच ऑर्डर देऊ शकाल.