Tech Tips: रात्री स्मार्टफोन फुल चार्ज, पण सकाळी मात्र बॅटरी डिस्चार्ज? या 5 सेटिंग आहे तुमच्या समस्येचं Solution
तुम्ही एकदिवस तरी स्मार्टफोनशिवाय राहू शकता का? स्मार्टफोनशिवाय राहणं म्हणजे गेमिंग नाही, चॅटिंग नाही, कॉलिंग नाही आणि फोटोग्राफी देखील नाही. आजच्या डिजीटल जगात एक दिवसही स्मार्टफोनशिवाय जगणं कठीण आहे. स्मार्टफोन आपल्याला घरबसल्या शॉपिंगपासून पेमेंटपर्यंत सर्वकाही करण्याची सुविधा देतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन दिवसभर चालू राहणं अत्यंत गरजेचं आहे. स्मार्टफोन दिवसभर चालू राहण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे स्मार्टफोनची बॅटरी.
बॅकग्राउंड अॅप्स, ऑटोमॅटिक अपडेट, ऑलवेज ऑन डिस्प्ले, लोकेशन सर्विस ही काही कारण आहेत ज्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. आपल्याला दिवसभर आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी स्मार्टफोनची गरज असते. स्मार्टफोन नसेल तर आपली बरीच कामं अडतात. मग अशा परिस्थितीत आपल्या स्मार्टफोनची बॅटरी दिवसभर टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र अशी काही कारणं आहेत, ज्यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. (फोटो सौजन्य – Pinterest)
सकाळी ऑफीस आणि कॉलेज जाण्याची घाई असते. त्यामुळे बहुतेक लोकं स्मार्टफोन रात्रीचं फुल चार्ज करून ठेवतात. मात्र जेव्हा सकाळी उठून बघतात, तेव्हा स्मार्टफोनची बॅटरी काहीशी डिस्चार्ज झालेली असते. जर तुम्ही रात्री स्मार्टफोन 100 टक्के चार्ज केला असेल तर सकाळी त्याची बॅटरी 80 टक्के होते. अनेकजण आजही या समस्येचा सामना करत आहेत. तुम्ही देखील अशाच लोकांपैकी आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता आम्ही तुम्हाला तुमच्या या समस्येवर काही उपाय सांगणार आहोत.
आपल्या स्मार्टफोनमध्ये असे अनेक अॅप्स असतात जे बॅकग्राऊंडमध्ये अॅक्टिव्ह असतात. ज्यामुळे बॅटरी संपते. तुमच्या देखील स्मार्टफोनमध्ये असे काही बॅकग्राऊंड अॅप्स सुरु असतील तर ते त्वरीत बंद करा. कारण स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपण्यामागे बॅकग्राऊंड अॅप्स कारणीभूत ठरतात.
लोकेशन सर्विस सतत सुरु ठेवल्याने स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे गरज नसताना तुमच्या स्मार्टफोनची लोकेशन सर्विस बंद ठेवा, ज्यामुळे बॅटरी सेव्ह होईल.
बरेच लोक त्यांच्या डिव्हाइसमध्ये ऑटोमॅटिक अॅप अपडेट पर्याय चालू ठेवतात, ज्यामुळे बॅटरीचा वापर देखील वाढू शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही हा पर्याय चालू ठेवला असेल तर तो लगचेच बंद करा. यामुळे रात्रीच्या वेळी अनावश्यक बॅटरीचा वापर टाळता येतो. ज्यामुळे बॅटरी दिर्घकाळ टिकते.
आजकाल अनेक स्मार्टफोनमध्ये ऑलवेज ऑन डिस्प्लेचा ऑप्शन देखील दिला जातो. मात्र यामुळे बॅटरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्ही देखील या फीचरचा वापर करत असाल तर स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपण्यामागे हे देखील एक कारण असू शकतं.