
'या' खास आणि बंद केलेल्या फीचरद्वारे YouTube करणार मोठा धमाका (Photo Credit - X)
टेस्टिंग कुठे सुरू झाली आणि कोणाला मिळणार फीचर?
यूट्यूबने दिलेल्या माहितीनुसार, सध्या In-App Direct Messaging फीचरची चाचणी फक्त आयलँड (Ireland) आणि पोलंड (Poland) येथील युजर्ससोबत केली जात आहे.
वयाची अट: सध्या हे फीचर फक्त १८ वर्षांवरील लोकांसाठी उपलब्ध आहे.
उद्देश लोक कोणताही व्हिडिओ WhatsApp, Instagram किंवा Telegram वर पाठवण्याऐवजी, तो थेट यूट्यूब ॲपमध्येच शेअर करू शकतील आणि त्याबद्दल खासगी गप्पा (चॅट) मारू शकतील. आतापर्यंत लोक व्हिडिओ पाहिल्यानंतर गप्पा मारण्यासाठी ॲप सोडून इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जात होते. यूट्यूबला ही सवय बदलायची आहे.
🟢 The DM feature is coming back to YouTube. Users will now be able to chat on YouTube. pic.twitter.com/K8BejQjDuf — Mediterranean Times (@mediterrantimes) November 20, 2025
हे देखील वाचा: गुगलचा नवा अपडेट! आता ePNV च्या माध्यमातून होणार सुरक्षितता अधिक बळकट
DM ची परतफेड: पण मर्यादेसह
यूट्यूबने यापूर्वी DM आणले होते, पण काही वर्षांतच ते बंद केले. त्यावेळी कंपनीने म्हटले होते की, त्यांना त्यांची ऊर्जा सार्वजनिक टिप्पण्या (Public Comments) आणि कम्युनिटी पोस्टवर केंद्रित करायची आहे. मात्र, शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ आणि खाजगी संवादाचा वाढता ट्रेंड पाहता यूट्यूब आता मागे राहू इच्छित नाही. गूगलने स्पष्ट केले आहे की, हे DMs पूर्णपणे खाजगी (Private) असणार नाहीत. कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, काही प्रकरणांमध्ये या चॅट्सची तपासणी होऊ शकते. सध्या हे फीचर फक्त मूलभूत कार्य देईल—जसे की व्हिडिओ शेअर करणे आणि छोट्या खासगी ग्रुपमध्ये चॅट करणे.
इंस्टाग्राम आणि टिकटॉकला थेट आव्हान
यूट्यूबच्या या निर्णयामुळे स्पष्ट होते की, हा प्लॅटफॉर्म स्वतःला केवळ एक व्हिडिओ साइट नाही, तर एक सोशल नेटवर्क म्हणून प्रस्थापित करू इच्छितो. इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर तरुणवर्गात सार्वजनिक पोस्टऐवजी DMs मध्ये व्हिडिओ शेअर करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. यूट्यूबने हे ओळखले आहे आणि त्यांच्या Shorts व्हिडिओची चर्चा ॲपमध्येच कायम राहावी, असे कंपनीला वाटते.
जागतिक स्तरावर कधी येणार?
यूट्यूब सध्या या फीचरला एक “एक्सपेरिमेंट” (प्रयोग) म्हणून पाहत आहे. आयलँड आणि पोलंडमध्ये याला चांगली प्रतिक्रिया मिळाल्यास, हे फीचर २०२५ मध्ये अनेक देशांमध्ये सुरू केले जाऊ शकते. गेल्या ५-६ वर्षांतील यूट्यूबच्या सोशल स्ट्रॅटेजीमधील हा सर्वात मोठा बदल मानला जात आहे.
हे देखील वाचा: Cloudflare म्हणजे काय? या आउटेजमुळे ChatGPT, X, Spotify सारख्या वेबसाइट्सही ठप्प