
फोनपे आणि गुगल पेसाठी नवं आव्हान! Arattai नंतर Zoho घेऊन येणार सुपर UPI अॅप, लवकरच बदलणार ऑनलाईन पेमेंटचा अंदाज
ऑनलाइन पेमेंट सध्याच्या काळाची गरज बनली आहे. लोकं सुट्टे पैसे बाळगण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट करण्याला अधिक महत्त्व देतात. ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक वेगवेगळे ॲप्स देखील उपलब्ध आहेत. आता या ॲप्समध्ये भर घालण्यासाठी आणखी एक नवीन अॅप लाँच केलं जात आहे. हे नवीन ॲप Zoho लाँच करणार आहे. Zoho ची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कारण या कंपनीने अलीकडेच Arattai ॲप आणि Ulaa ब्राउजर लाँच केले होते. आता ही कंपनी यूपीआय ॲप लाँच करण्याच्या तयारीत आहे. फोनपे, गुगल पे, पेटिएम यांसारख्या यूपीआय ॲप्सना टक्कर देण्यासाठी Zoho लवकरच नवीन ॲप लाँच करणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता Zoho UPI-बेस्ड कंज्यूमर पेमेंट प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे. हे प्लॅटफॉर्म Zoho Pay या नावाने लाँच केले जाणार आहे. पेटीएम, फोनपे आणि गूगल पेसोबत स्पर्धा करण्यासाठी हे नवीन प्लॅटफॉर्म लाँच केलं जाणार आहे. Zoho चे Arattai ॲप व्हॉट्सॲपचे मेड इन इंडिया ऑल्टरनेटिवच्या जागी पाहिले जात आहे आणि गेल्या काही दिवसांत याच्या युजर्स संख्येत देखील वाढ झाली आहे. Ulaa ब्राउजर गुगल क्रोमला टक्कर देण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिळालेल्या माहितीनुसार, Zoho Pay एक स्टँडअलोन ॲप असणार आणि याला Arattai मेंसेंजरमध्ये देखील इंटीग्रेट केले जाणार आहे. व्हॉट्सॲपप्रमाणे Arattai या ॲपच्या युजर्सना देखील ॲपमध्ये चॅटिंग आणि पेमेंट दोन्ही ऑप्शन मिळणार आहेत. Zoho कडे आधापासूनच पेमेंट-एग्रीगेटर लाइसेंस आहे आणि हे जोहो बिजनेसद्वारे बिजनेस पेमेंट ऑफर करते. आता UPI पेमेंट इकोसिस्टममध्ये आल्यानंतर स्पर्धा अतिशय तीव्र होणार आहे. फोनपे, गुगल पे, पेटिएम यांसारख्या यूपीआय ॲप्सना टक्कर दिली जाणार आहे.
आतापर्यंत Zoho Pay या नवीन पेमेंट प्लॅटफॉर्मची लाँच डेट जाहिर करण्यात आली नाही. मात्र अशी शक्यता वर्तवली जात आहे की, येणाऱ्या तिमाहित हे प्लॅटफॉर्म लाँच केलं जाऊ शकतं. सध्या या प्लॅटफॉर्मची चाचणी सुरु करण्यात आलिी आहे. असं सांगितलं जात आहे की, हे प्लॅटफॉर्म अँड्रॉईडसोबतच iOS साठी देखील लाँच केलं जाऊ शकतं.
भारतातील डिजिटल पेमेंट नेटवर्क जगात सर्वात जास्त सक्रिय आहे, ज्यामध्ये सर्वाधिक डिजिटल पेमेंट UPI द्वारे केले जातात. अलीकडील अहवालानुसार, 2024 मध्ये यूपीआयद्वारे 17,221 कोटी व्यवहार झाले होते, तर 2019 मध्ये ही संख्या 1,079 कोटी होती. या व्यवहारांच्या एकूण मूल्यावर नजर टाकल्यास, 2019 मध्ये 18.4 लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता, तर 2024 मध्ये ही संख्या वाढून सुमारे 247 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली.