Redmi K90 Pro Max: अहो, कार नाही! हा तर Redmi चा नवा Lamborghini स्मार्टफोन; डिझाईन पाहून प्रेमात पडाल
स्मार्टफोन कंपनी रेडमीने त्यांच्या युजर्ससाठी एक खास सरप्राईज आणलं आहे. ज्यांना Lamborghini कार्सची आवड आहे, त्यांच्यासाठी हे सरप्राईज अतिशय स्पेशल ठरणार आहे. रेडमीने स्पोर्ट्स कार कंपनी Lamborghini सह पार्टनरशिप केली आहे. यानंतर कंपनीने Redmi K90 Pro Max चे एक स्पेशल एडिशन मॉडेल लाँच केले आहे. कंपनीने या नवीन मॉडेलचे टिझर चाइनीज सोशल मीडिया वेबसाइट Weibo वर शेअर केले आहे. कंपनीने केलेल्या या पार्टनरशिपनंतर यूजर्सना अल्ट्रा प्रीमियम डिझाईन आणि हाई-एंड परफॉर्मेंस दोन्हींचा फायदा मिळणार आहे.
कंपनीने नवीन Redmi K90 Pro Max Champion Edition लाँच केले आहे. Redmi K90 Pro Max Champioition ला Lamborghini च्या Squadra Corse motorsport division च्या कोलॅबरेशनमध्ये तयार करण्यात आले आहे. हे डिवीजन Lamborghini च्या वर्ल्ड एंड्यूरेंस चँपियनशिप सारखे रेसिंग एक्टिविटीज संभाळतो. या एडिशनमध्ये स्पीड आणि पावरचा अनुभव करणारे रेस-इंस्पायर्ड डिझाईन देण्यात आले आहे. (फोटो सौजन्य – X)
Redmi partners with Lamborghini SQUADRA CORSE for the Redmi K90 Pro Max Champion Edition. pic.twitter.com/1812xfa7ie — Abhishek Yadav (@yabhishekhd) October 23, 2025
नवीन Redmi K90 Pro Max Champion Edition मध्ये तोच Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो स्टँडर्ड मॉडलमध्ये आहे. हे Qualcomm चे 2025 मधीस फ्लॅगशिप चिपसेट आहे, जो हाय-स्पीड प्रोसेसिंग, गेमिंग आणि AI टास्क्ससाठी ऑप्टिमाइज्ड आहे, D2 AI ग्राफिक्स चिप यांचा समावेश आहे, जो गेमिंग आणि मल्टीमीडिया अनुभव अधिक चांगला बनवतो. यासोबतच यामध्ये इंटेलिजेंट पावर मॅनेजमेंट सिस्टम देखील आहे, ज्यामुळे बॅटरी एफिशिएंसी वाढते.
स्टँडर्ड Redmi K90 Pro Max मध्ये 2.1 स्टीरियो सिस्टम देण्यात आला आहे, ज्याला Bose सह डेव्हलप करण्यात आले आहे. यामध्ये दोन सुपर लीनियर स्पीकर्स आणि एक मोठा वूफर देखील आहे, जो इमर्सिव ऑडियो एक्सपीरियंस ऑफर करतो. मात्र, Champion Edition मधून Sound by Bose ब्रांडिंग हटवण्यात आली आहे. या एडिशनमध्ये वेगवेगळे स्पीकर्स असतील की तीच सिस्टम अबाधित राहील याची पुष्टी होत नाही.
या फोनमध्ये IP68 रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. याचा अर्थ असा की हा स्मार्टफोन केवळ कामगिरीतच नाही तर बिल्ड गुणवत्तेतही प्रीमियम फील देईल. K90 Pro Max Champion Edition मध्ये 6.9-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो फुल RGB कलर सिमुलेशन आणि DC Dimming ला सपोर्ट करतो. हे पॅनेल कमी ब्राइटनेसमध्ये (1 निट पर्यंत) देखील विजिबल राहते, ज्यामुळे डोळ्यांना आरामदायी पाहण्याचा अनुभव मिळतो. कॅमेरा सेटअपमध्ये 5x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस, 10x लॉसलेस झूम आणि OIS सपोर्टसह Light Hunter 950 सेंसर, 1/1.31-इंच मुख्य कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा-वाइड लेंस देण्यात आली आहे. या सर्व कॅमेरा फीचर्समुळे फोटोग्राफी प्रोफेशनल-ग्रेडची बनते.
Redmi K90 Pro Max Champion Edition ची किंमत चीनमध्ये सुमारे 4,000 युआन म्हणजेच 50,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन Redmi च्या प्रीमियम रेंजचे प्रतिनिधित्व करतो, परंतु सध्या तो फक्त चीनी बाजारपेठेसाठी आहे. कंपनीने अद्याप जागतिक लाँचिंगबद्दल कोणतीही माहिती उघड केलेली नाही.






