फोटो सौजन्य-एआय
Nashik Kotwal Recruitment 2026: नाशिक उपविभागांतर्गत नाशिक तालुक्यातील सजेतील महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शासनाच्या विशेष मान्यतेनुसार नाशिक तालुक्यातील ३१ ऑगस्ट २०२६ अखेर रिक्त असलेली १५ पदे या भरती मोहिमेतून भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना https://nashik.kotwal.org या अधिकृत संकेतस्थळावरून ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत देखील १७ ऑक्टोबर २०२६ हीच आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ ते ४० वयोगटाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक अर्हता किमान चौथी पास असणे अनिवार्य असून, अर्जदार संबंधित सजेतील (गावातील) स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या महसूल सेवकांना (कोतवाल) शासन निर्णयानुसार दरमहा १५,००० रुपयांचे मानधन दिले जाईल. ही परीक्षा ५० बहुपर्यायी प्रश्नांची आणि एकूण १०० गुणांची असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेत किमान ४० गुण मिळवणे उमेदवारांसाठी बंधनकारक राहील.
Education Update: आता नववीची मुले शिकणार बिझनेसचे धडे; अभ्यासक्रमात ‘या’ स्टार्टअप्सचा समावेश!
खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ६०० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०० रुपये निश्चित करण्यात आले असून, हे शुल्क नेटबँकिंग, डेबिट/क्रेडीट कार्ड किंवा यूपीआय (गुगल पे, फोन पे) द्वारे ऑनलाईन पद्धतीने जमा करता येईल. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी संकेतस्थळावर दिलेली सविस्तर माहिती आणि अटी काळजीपूर्वक वाचून घ्यावीत, कारण इतर कोणत्याही माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरती प्रक्रियेतील पुढील सर्व अद्यतनांसाठी उमेदवारांनी केवळृत अधिकृत संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देणे आवश्यक आहे.






