नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भासाठी ८ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह माध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे.
पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना कंपनीकडे तक्रार करावी लागणार आहे. प्रशासनानेही नुकसानीच्या संयुक्त पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पावसामुळे सर्व पिकांची वाढ खुंटल्याने उत्पन्नातही मोठी घट येणार आहे.…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे वैजापूर शहरांमध्ये सुरू असल्या आठवणी बाजारात पाणी घुसल्याने बाजारपेठ ठप्प झाली तर काही प्रमाणात नुकसानही झाले.
बार्शिटाकळी तालुक्यात सरासरी पाऊस 53.9 मिमी झाला असून अतिवृष्टीची नोंद राजंदा येथे 119.5 मिमी. करण्यात आली. अकोट तालुक्यात सोमवारी सरासरी पाऊस 31.4 मिमी. झाला असून, अतिवृष्टीची नोंद चोहट्टाबाजार 106 मिमी.…