मराठवाड्यात पावसाची जोरदार बॅटिंग; परभणी, नांदेडसह हिंगोलीत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी अतिवृष्टी
नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भासाठी ८ जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह माध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे वातावरणात आद्रता वाढली असून पुढील चार दिवस अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम या चार भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचे सत्र राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
‘तो’ कुरिअर बॉय नव्हे तिचा मित्रच! कोंढव्यातील तरुणीवरील अत्याचारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर
जून महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील नद्यांचे व नाल्यांचे पात्र चांगलेच भरले आहे. अमरावती जिल्ह्यात पूर्ण नदीवरील धरणातील जलपातळी झपाट्याने वाढत असून, हवामानाच्या अनुषंगाने तेथून कधीही विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. परिणामी, पूर्ण नदीवरील काठावर वसलेल्या गावांना सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
आपत्ती व्यवस्थापन सतर्क
अकोला जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. संभाव्य पूरस्थिती लक्षात घेत राष्ट्रीय आपत्ती निवारण दल व राज्य आपत्ती निवारण दल यांच्यासाठी सामानाचे साधण्यात आले आहे. महावितरण, पोलीस, पालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वीज पडण्याची पूर्वसूचनेसाठी या अॅपचा वापर करा
वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्यासाठी दामिनी नावाच्या अॅपचा वापर करा. वीज पडण्याच्या पूर्वसूचनेसाठी हा अॅप अत्यंत उपयुक्त ठरते. नागरिकांना त्यांच्या परिसरातील वीज पडण्याची शक्यता दर्शवते. त्यामुळे नागरिकांनी हे अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे आणि सतत हवामानाचा मागोवा घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
शाळांनाही सूचना
अकोला जिल्ह्यातील सर्वच नद्या पावसामुळे दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे, स्थानिक ग्रामपंचायतींना संपर्कात ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे, पावसामुळे काही शाळांच्या परिसरात पाणी साचल्याने जिल्हा शिक्षण विभागाने शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. विध्यार्थ्यांना पावसात बाहेर न सोडण्याबाबत पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येणेगुर येथील एका विद्यालयातील २९ विद्यार्थ्यांना विषबाधा; सर्वांची प्रकृती स्थिर






