Tomato Soup Recipe: कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये बनवा गरमागरम टोमॅटो सूप, शरीर राहील फ्रेश
Tomato Soup Recipe: राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण या दिवसांमध्ये थंड वातावरणामुळे आजार वाढतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते आणि शरीरात थकवा जाणवू लागतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आहारात वेगवेगळ्या उष्ण आणि शरीरात ऊबदारपणा टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. थंड वातावरणात सगळ्यांचं काहींना काही गरमागरम खाण्याची इच्छा होते, अशावेळी टोमॅटो सूप किंवा इतर वेगवेगळ्या भाज्यांचे सूप बनवले जातात. पण हॉटेलमध्ये सूप बनवताना त्यात कॉर्नफ्लोअरचा वापर केला जातो. पण आज आम्ही तुम्हाला कॉर्नफ्लोअरचा अजिबात वापर न करता क्रिमी टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सूप घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






