दानवेंनी पोलिसांच्या वागणुकीवरही संशय व्यक्त केला असून, त्यांच्याकडे असलेले CCTV पुरावे मुख्यमंत्री तसेच गरज पडल्यास उच्च न्यायालयासमोर मांडणार असल्याचे सांगितले.
पैशांच्या गड्ड्यांसह एक आमदार काय करत आहे. असा सवाल दावने यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवेंनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला.
अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी पैशांच्या गड्ड्यां मोजताना दिसत आहेत. पण या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
राज्यभरातील 'लाडक्या बहिणी' एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असताना, काही लाभार्थी महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.