तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा पलटवार
पैशांच्या गड्ड्यांसह एक आमदार काय करत आहे. असा सवाल दावने यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवेंनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला. “या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आमदार महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
दानवेंच्या आरोपाला प्रत्युत्तर देत महेंद्र दळवी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. “व्हिडिओमधील व्यक्ती मी नाही. दानवे यांनी महाराष्ट्राला पुरावा दाखवावा. तो मीच आहे का? काय बोलतोय? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे.” असं दानवेंनी म्हटलं आहे. तसेच, अंबादास दानवेना आता कोणता कामधंदा उरला नाही. ब्लॅकमेल करणं हा त्यांचा धंदा आहे. त्यांनीच महाराष्ट्राला पुरावे दाखवावेत, मी उद्या असेच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे फोटो आणि व्हिडीओ टाकेल, चालेल का,? असा प्रतिप्रश्नही महेंद्र दळवी यांना केला आहे.
याशिवाय, ब्लॅकमेल करणं ह दानवेंचा धंदा आहे. विरोधी पक्षाला आता कुठलेही काम उरलेले नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओत मी नाही. हा व्हिडीओत कोण आहे. ते दानवेंनाच विचारावे, त्या फोटोतील – व्हिडीओतील व्यक्तींचे म्हणणे काय आहे. हे महाराष्ट्रालाही कळले पाहिजे. तसेच, विधीमंडळात हिवाळी अधिवेशनात याबाबत मी प्रश्न विचारणार आहे. अंबादास दानवे यांच्या मागे कोण आहे, त्यांनी सुपारी कुणी दिली, त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे लोकांना समजले पाहिजे, असंही दळवींनी म्हटलं आहे.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo — Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025






