शिंदे गटाचा आमदार, नोटांचा ढिग, व्हिडिओ व्हायरल; अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब' Video
अंबादास दानवे यांनी त्यांच्या ट्विटर एक्स अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमापीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे. जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?ट असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
इस्कॉन मंदिरात ‘ही- मॅन’ ला वाहिली श्रद्धांजली; ९० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला संगीत कार्यक्रम
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo — Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अंबादास दानवे एका वृत्तवाहिनीशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. या नोटांच्या गड्ड्या कुणाच्या आहेत, काय आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण पोलिसांनी या व्हिडीओची चौकशी केली, पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. गोगावले म्हणाले की, त्या व्हिडीओमध्ये कोणता आमदार आहे, किती बंडलं आहेत, हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाही, आम्हाला हे व्हिडिओ तपासायचे आहेत. कोण आमदार आहे, किती बंडल आहेत आणि हे पैसे कोणत्या संदर्भात आहेत, हे समजणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले. दानवे सतत तक्रारी करत असल्याचे सांगत, त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नसल्याने “कदाचित त्यांची शोध मोहीम सुरू असावी,” अशी टीकाही त्यांनी केली.
अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपला टॅग करून सरकारकडून स्पष्ट उत्तर देण्याची मागणी केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता असून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करू शकतात.






