२००५ मध्ये झालेल्या ५८ व्या जागतिक आरोग्य सभेत, जगभरातील आरोग्य मंत्र्यांनी एकमताने जागतिक रक्तदाता दिन दरवर्षी १४ जून रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि तो साजरा करण्यासाठी लैंडस्टाइनरचा वाढदिवस निवडला.…
राज्य रक्त संक्रमण परिषदेची जबाबदारी राज्यातील रक्ताच्या उपलब्धतेवर देखरेख ठेवण्याची आहे. यासाठी मनुष्यबळ, रक्तसाठा, रक्तदात्यांच्या अद्ययावत याद्या आणि दुर्मीळ रक्तगट दात्यांचे नेटवर्क सतत सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली ही अत्याधुनिक यंत्रणा मोठ्या प्रमाणावरील नियमित तसेच तातडीच्या बायोकेमिकल तपासण्या वेगाने आणि अचूकपणे करण्यास सक्षम आहे.
घाटकोपरमधील राजावाडी, वांद्रे येथील भाभा, कांदिवलीतील शताब्दी, कुर्ला येथील भाभा आणि बोरिवलीतील भगवती रुग्णालय येथील रक्तपेढ्यांसाठी निविदा मागवण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी केंद्र सरकारने ई-रक्तकोश पोर्टल तयार केले. या पोर्टलवर सर्वच जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
येमेनच्या महदी कुटुंबाने केरळच्या परिचारिका निमिषा प्रियाला लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली आहे. महदी कुटुंबाने येमेनच्या हुथी सरकारने निमिषाला लवकर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.