रक्तासाठीची धावपळ संपणार! रक्तसाठ्याची माहिती ई-रक्तकोशवर, रक्तसाठ्याची माहिती एका क्लिकवर
रुग्णांना आवश्यक रक्तसाठ्याची माहिती सहज आणि तत्काळ मिळावी, यासाठी केंद्र सरकारने ‘ई-रक्तकोश’ हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले. या पोर्टलमुळे थेंलसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेलसह विविध आजारांच्या रुग्णांना रक्त मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. रुग्ण, रक्तदान शिबिरांचे आयोजक आदींना उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती सहज मिळावी, यासाठी केंद्र आरोग्य मंत्रालयाने शासनाने ‘ई- रक्तकोश पोर्टल’ विकसित केले. या पोर्टलवर रक्ताविषयीची सर्व माहिती एका क्लिकवर मिळते. थैलसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्ताशी निगडित इतर आजारांचे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांची रक्त मिळवण्यासाठीची धावपळ मात्र कमी होणार आहे.(फोटो सौजन्य – AI)
Amravati जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त; सोशल मीडियावर ठेवली जाणार नजर
रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना रक्त मिळविण्यासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी केंद्र सरकारने ई-रक्तकोश पोर्टल तयार केले. या पोर्टलवर सर्वच जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांची नोंदणी असून, तेथे उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती रोज या पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. अनेकदा रुग्णाला वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून रक्ताची गरज भासते. रुग्णालयात रुग्णाला हवा असणारा रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे नातेवाइकांना रक्त आणण्यासाठी सांगितले जाते. त्यावेळी नातेवाइकांना रक्त मिळविण्यासाठी भटकावे लागते. अनेक रक्तपेढ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र, आता या ई-रक्तकोशमुळे रुग्णाला हवे असणारे रक्त कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे, याची माहिती तत्काळ मिळणार आहे.
पोर्टलच्या होमपेजवर किती रक्तदात्यांची आतापर्यंत नावनोंदणी झाली. किती रक्तसंकलन झाले याची माहिती तसेच रक्त शोधण्यासाठी एक खिडकीदिली आहे. तेथे कोणत्या गटाचे रक्त, रक्तघटक कोणत्या शहरात, रक्तपेढीत उपलब्ध आहेत, हे समजते. रक्तदान आयोजकांनाही येथे नोंदणी करणे शक्य आहे. राज्यात, देशात किती रक्तपेढ्या उपलब्ध आहेत, याची नोंदही आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक रक्तसाठा शोधणे शक्य होते.
ई-रक्तकोशवर कोणत्या रक्तपेढीमध्ये कोणत्या गटाचे किती रक्तसाठा उपलब्ध आहे. याची माहिती तत्काळ मिळणार आहे. या पोर्टलवर रोज रक्तपेढ्यांना उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती अपलोड करावी लागते. तसेच जिल्ह्यात एकूण २ शासकीय आणि ६ खासगी, असे एकूण ८ रक्तपेढ्या आहेत. या रक्तपेढ्यांमधील उपलब्ध रक्तसाठा या पोर्टलवर उपलब्ध आहे. तसेच ई-रक्तकोश पोर्टलवर रक्तदान शिबिरांचीही नोंदणी करता येणार आहे. रुग्णाला हव्या असणाऱ्या रक्ताची माहिती, आजूबाजूच्या शहरात उपलब्ध आहे का? याची माहितीही उपलब्ध होणार आहे.






