महाराष्ट्र पोलीस दलात वरिष्ठ स्तरावर मोठी खांदेपालट झाली असून, राज्यभरातील एकूण २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही फेरबदल महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
पुण्यातील शस्त्र तपासणी शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची राज्य राखीव पोलिस दल (SRPF) गट १, पुणे येथे कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.