शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊसदराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यादरम्यान सरकारच्या आणि साखर कारखानदारांच्या विरोधात त्यांनी तीव्र इशारा दिला आहे.पहिल्या हप्त्यापोटी पहिली उचल 4500 रुपये जाहीर करावेत आणि एकंदर एकूण पाच हजार रुपये भाव मिळावा अशी राजू शेट्टी यांची मुख्य मागणी आहे. काल सुद्धा ऊस दराबाबत बैठक झाली पण दुसरी बैठकही निष्फळ ठरलेली आहे. आणि जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उसाचं एकही कांड कारखान्याला जाऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलेला आहे. तसेच मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या 3 नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा राजू शेट्टींनी सरकारला दिला आहे.