परभणी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनामुळे महानगरपालिकेच्या विविध विभागांचे कामकाज ठप्प झाले असून, शहर अभियंता विभाग, नगररचना विभाग तसेच परभणी महानगरपालिकेचे प्रभाग समिती ‘ब’ कार्यालय कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.