प्रभाग २५ मध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याने, तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना विश्रामबाग वाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
पुण्यातील धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आहे. या कार्यकारणीमध्ये पुण्यातील जवळपास सर्वच भागातून नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.
प्रभाग क्र 25 मधील ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागातच सुसज्ज आरोग्यसेवा उभारून ज्येष्ठ नागरिकांना दूरवर जावे लागू नये म्हणून प्रयत्न करणार असल्याचे राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सांगितले.
खजिना विहीर, स्वामी समर्थ मंदिर आणि माडीवाले कॉलनीमार्गे बाजीराव रस्त्यावरील भिकारदास मारुती मंदिर येथे दर्शन घेत विजयाचा संकल्प करण्यात आला. त्यानंतर महाराणा प्रताप उद्यान येथे पदयात्रेचा समारोप झाला.